मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील विविध नाक्यांवरील तथा विविध रिक्षा थांब्यांवरोल १९ रिक्षाचालकांच्या श्री क्षेत्र अक्कलकोट – शिर्डी – पंढरपूर व इतर देवस्थानांच्या देवदर्शन यात्रेला आज सकाळी मालवण एस टी स्टॅन्ड येथील गजानन महाराज मंदिराकडून शुभारंभ झाला. या यात्रेदरम्यान जवळपास ६ दिवसांत हे सर्व रिक्षा चालक मालक बांधव अंदाजे १६०० किलोमीटरचा रिक्षा प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय बंद ठेवून मालवणचे सुप्रसिद्ध रिक्षा मॅकॅनिक संदेश फाटक हे देखील या सर्व रिक्षा चालक मालक बांधांसोबत प्रवास करत आहेत.
या यात्रेला जाणारे रिक्षा बांधव श्री. राजा मांजरेकर, श्री गौरव कदम, श्री. विद्या तांडेल, श्री. महेश मांजरेकर, श्री. विठू वराडकर, श्री. श्री. वरद धुरी, श्री. निलेश लुडबे, श्री. तेजस श्रावणकर, श्री. विश्वनाथ नाटेकर, श्री. सदा मयेकर, श्री. गिरीश मिठबांवकर, श्री. शैलेश गांवकर, श्री. किशोर वायंगणकर, श्री. अक्षय तावडे, श्री. शशांक तळाशिलकर, श्री. अमित कीर, श्री. संपूर्ण वेंगुर्लेकर, श्री. भाई मालंडकर असे आहेत.
काल २९ जानेवारीला या सर्व १९ रिक्षा चालकांची शोभायात्रा मालवण देऊळवाडा येथील सागरी महामार्गावरील पुला वरुन काढण्यात आली. त्यावेळी ज्येष्ठ रिक्षा बांधव संघटक श्री पप्पू कद्रेकर व अनेक रिक्षा बांधव हितचिंतकांनी या यात्रेला शुभेच्छा दिल्या.