शिवसेना (उबाठा) अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज़ खान यांच्या नेतृत्वाखाली होते आंदोलन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा – वाफोली मार्गावर गवळीटेम्बवाडी पर्यत गटाराचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत याबाबतचे नियोजन करण्यासाठी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी दिल्याने शिवसेना ( उबाठा )अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज़ खान यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी छेडलेले उपोषण सायंकाळी उशिरा स्थगित करण्यात आले. या ठिकाणी गटाराचे काॅन्क्रिटीकरण न केल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. यासाठी येथील ग्रामस्थांना घेऊन रियाज़ ख़ान यांनी उपोषण केले होते. या उपोषणाला राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोकण महिला आघाडी अध्यक्षा अर्चना घारे – परब, मनसे तालकाप्रमुख मिलिंद सावंत, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
यावेळी राजा खान, संजय आईर, मंथन गवस, मोहसीन खान, अन्वर खान, हनुमंत सावंत, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्र, मिताली सावंत, अक्षर खान, शेख़, बंड्या खान, विवेक गवस, गौरांग शेलेंकर, सुंदर सावळ, समीर ठाकूर, कृष्णा गायकवाड, विराज देसाई, बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर
आगलावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.