मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी काल १८ जानेवारीला दुपारी मालवण
मधील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथील कौटुंबिक सल्ला केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्राचे समुपदेशक श्री विजय कुडाळकर व आदिती कुडाळकर यांच्याशी त्यांनी कौटुंबिक सल्ला केंद्राची माहिती घेतली आणि कार्यप्रणाली समजून घेतली.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस हे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि मालवण पोलिस दल विविध सामाजिक विषयांवर जागृती करत आहेत. या दरम्यान कौटुंबिक व खाजगी संवेदनशील समस्यांचे देखिल नियोजनपूर्वक निराकरण व्हावे यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील राहील यासाठी कौटुंबिक सल्ला केंद्रा सारखी केंद्र ही समुपदेशन, सुसंवाद अशा माध्यमातून उचित् ठरतात असे यावेळी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. समुपदेशक श्री विजय कुडाळकर व आदिती कुडाळकर यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना पोलिस दलाला बॅरिस्टर नाय पै सेवांगण येथील कौटुंबिक सल्ला केंद्र हे सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून त्यांनी केंद्राला भेट दिल्याबद्दल आभार मानले. कौटुंबिक सल्ला केंद्राचे कायदा अभ्यासक सल्लागार, ज्येष्ठ समुपदेशक तथा मार्गदर्शक ॲड. मनोजकुमार गिरकर यांनी देखील पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.