संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या शिरगांव हायस्कूल मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या ३ खोल्या आणि पडवीला आज शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजून आले नाही. यात अंदाजे ७ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. संकेत चव्हाण आणि संतोष चव्हाण या युवकांना आग लागल्याचे समजताच त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेलीवाडी तील ग्रमस्थानी सुद्धा लगेच धावत जाऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीत ३ खोल्या आणि पडवी जळाली. तर किरकोळ धान्य कोठार जळाले. इमारतीचे छप्पर ही जळून खाक झाले. सकाळी संस्था पदाधिकाऱ्यांनी, प्राचार्य, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ यांनी देखील घटनास्थळी जाऊन पहाणी केली आणि देवगड पोलीस ठाण्याला, समाजकल्याण विभागाला लेखी कळविन्यात आले.