बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मळगांव इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कराटे, कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकताचे संस्थेचे चेअरमन मा. श्री मनोहर राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. मळगांव इंग्लिश स्कूल व परिसरातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे खेळ अवगत व्हावेत व अशा प्रकारच्या खेळामध्ये या परिसरातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या उद्देशानेच आम्ही हे प्रशिक्षण आमच्या प्रशाळेत सुरू करीत आहोत असे मत उद्घाटन भाषणात बोलताना चेअरमन मनोहर राऊळ व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री एम. बी. फाले, पर्यवेक्षक श्री. एस व्ही कदम, क्रीडा शिक्षिका सौ. ए. जी.मोर्ये, मार्शल आर्ट ट्रेनर श्री. किरण देसाई, पत्रकार श्री संजय भाईप, तंत्रशिक्षक श्री. राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. मार्शल आर्ट ट्रेनर श्री. किरण देसाई यांनी विद्यार्थी व पालकांना कराटे,कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो या क्रिडा प्रकाराविषयी माहिती दिली. तसेच कराटे,कीक बॉक्सींग, बॉक्सींग, तायक्वांदो याचे थोडक्यात प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. मुख्याध्यापक श्री एम. बी. फाले, क्रीडा शिक्षिका सौ. ए. जी. मोर्ये, तंत्रशिक्षक श्री. राकेश परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मळगांव परिसरातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.