25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १५ वा वित्त आयोग कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण व आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच कर्णिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी गावच्या सरपंच समृद्धी नर, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे ग्रामपंचायत सदस्या रिया धवन ग्रामसेविका नयना मिठबावकर प्रशिक्षक स्नेहा कामत व इतर ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर आरोग्य शिबिरामध्ये महिलांची संपूर्ण हिमोग्राम (CBC) कॅल्शियम शुगर,प्रोटीन, अल्बुमीन या सर्व तपासण्या करण्यात आल्या .

कौशल्य विकास निधीतून महिलांना निळ फिनोल, लिक्वीड वॉश,वॉशिंग पावडर बनविणे व विविध प्रकारचे मसाले बनवणे यांचा सारखे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.उपस्थित महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र चहा नाष्टा व जेवण देण्यात आले. १५ व्या वित्त आयोग मधून हा उपक्रम ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या उपक्रमाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १५ वा वित्त आयोग कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण व आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच कर्णिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी गावच्या सरपंच समृद्धी नर, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे ग्रामपंचायत सदस्या रिया धवन ग्रामसेविका नयना मिठबावकर प्रशिक्षक स्नेहा कामत व इतर ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर आरोग्य शिबिरामध्ये महिलांची संपूर्ण हिमोग्राम (CBC) कॅल्शियम शुगर,प्रोटीन, अल्बुमीन या सर्व तपासण्या करण्यात आल्या .

कौशल्य विकास निधीतून महिलांना निळ फिनोल, लिक्वीड वॉश,वॉशिंग पावडर बनविणे व विविध प्रकारचे मसाले बनवणे यांचा सारखे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.उपस्थित महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र चहा नाष्टा व जेवण देण्यात आले. १५ व्या वित्त आयोग मधून हा उपक्रम ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या उपक्रमाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!