26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

‘सबमरीन प्रकल्प गुजरात राज्यात’ ही बातमी बनणे आणि यावर नकारात्मक चर्चा करणे दुर्देवी : पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर.

- Advertisement -
- Advertisement -

किल्ले निवती, निवती दीपगृह व पाणबुडी व सर्वच टूरिझम प्रकल्पांसाठी पर्यटन महासंघ प्रयत्नशील अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील असल्याचीही दिली माहिती.

मालवण | सुयोग पंडित : पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सध्या सुरू असलेल्या पर्यटन घडामोडींवर विशेष माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सबमरीन प्रकल्प गुजरात राज्यात ही बातमी बनणे आणि यावर नकारात्मक चर्चा करणे दुर्देवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारे पैसे पर्यटन विभागाकडे उपलब्ध वास्तविक जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढवण्यासाठी स्थानिकामधील समन्वय राजकीय इच्छाशक्त्ती ची प्रचंड आवशक्यता व यासाठी सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. ज्या पद्धतीने राजकोट किल्ला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, श्री पुण्य क्षेत्र मोरयाचा धोंडा शासकीय पूजा सारख्या ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी धाडसी निर्णय घेतलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा म्हणून उभारी घेत असल्याने त्यांच्या नेतृत्वात अश्या प्रकारचे पर्यटन पूरक प्रकल्प जिल्ह्यातुन बाहेर न जाण्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघाला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्ष झाली असून तारकर्ली देवबाग भोगवे कुणकेश्वर सारखे काही मोज़केच किनारपट्टी सोडून जिल्ह्यातील १२१ कि. मी. किनारपट्टी पर्यटन पूरक व्यवसाय निर्माण झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशाच वेंगुर्ला तालुक्यात निवती भाग पर्यटन दृष्ट्या जागतिक पातळीवर येण्याची ताकद या भागात असलेल्या निवती किल्ला तसेच येथूनच समुद्रात उभ्या असलेले निवती दीपगृह आणि या परिसरात समुद्राखाली असलेले विविध प्रकारचे मासे ,कोरल जागतिक पर्यटनाची क्षमता असलेला भाग पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील असून निवती किल्ला परिसर तसेच निवती दीपगृह पर्यटनासाठी पर्यटकांना खुले करण्यासाठी तसेच निवती दीपगृह परिसरातील जलपर्यटनसाठी पाणबुडी सबमरीन प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे सादर करण्यात येणार आहे यासाठी स्थानिक मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांशी सकारात्मक चर्चा होऊन या भागात संयुक्त रित्या प्रकल्प उभा झाल्यास वेंगुर्ला तालुक्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन नकाशा वर येण्यास मदत होईल पाणबुडी प्रकल्पासाठी राज्याचे शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर प्रयत्नशील असून हा पाणबुडी प्रकल्प होणारच आहे तसेच जिल्ह्यातील सर्व गडकिल्ल्याचे शासकीय अधिकृत माहिती असलेले शासकीय पुस्तक बनविण्याचे आदेश पालकमंत्री यांनी स्थानिक जिल्हाप्रशासनास दिले असून प्रशासकीय पातळीवर यावर काम चालू आहे अशीही माहिती विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

निवती किल्ल्यावर पर्यटन दृष्ट्या डेव्हलपमेंट साठी पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखविला असून निवती दीपगृह या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन निवती भाग पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघाचा मानस असल्याची माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!