23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

विकास कामांवर स्वतःचे ‘बॅनर स्टीकर’ लावण्याचे काम करणार्या आ. वैभव नाईक यांचे डिपाॅझिट जप्त करून करणार पराभव ; भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर गरजले.

- Advertisement -
- Advertisement -

दिसेल ते विकास काम आपणच केले’ असे दाखवायचा ठाकरे गटाचा नवीन फंडा असल्याचीही केली टीका..!

“होय…आम्ही ‘मोदी सरकार’ असेच संबोधणार” ; विजय केनवडेकर यांची स्पष्टोक्ती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष विजय केनवडेकर व मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मालषणच्या भाजप कार्यलयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांचा दारूण पराभव करणार असल्याची आक्रमक गर्जना केली. भाजप युती राज्य शासन माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय आपले म्हणून सांगत विकास कामांचे श्रीफळ फोडायचे तसेच बॅनर स्टिकर लावून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गट करत आहे. त्यांनी हा नवीन फंडा काढला आहे. दिसेल ते काम आपणच केले यासाठी बॅनरबाजी करण्यासाठी कोल्हापूर येथे होलसेल मार्केटमध्ये त्यांनी बॅनर छपाई सुरु केली आहे. मात्र त्यांचे फसवणूकीचे धंदे २०२४ विधानसभा निवडणुकीत बंद होणार.

आमदार वैभव नाईक यांचे डिपॉजिट जप्त करून त्यांच्या पराभवासाठी भाजप कार्यकर्ते व कुडाळ मालवणची जनता सज्ज आहे. असा जोरदार हल्लाबोल भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लागावला. मालवण कुडाळ मतदारसंघात भाजप नेते निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली शासनाच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणला आहे. विकास निधीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. २०२४ ला निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याचेही चिंदरकर, केनवडेकर यांनी सांगितले.

भाजप मालवण कार्यालय येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चाव्हण, नांदोस उपसरपंच विजय निकम, नंदू देसाई यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जनहिताच्या योजना आणल्या. मालवणात १० हजार लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ५० कोटी, उज्वला गॅस, आनंदाचा शिधा, आयुषमान भारत हजारो लाभार्थी, फेरीवाले साठी १० हजार कर्ज मालवण १७०० लाभार्थी, मत्स्य संपदा योजनेतून ई बाईक, इन्सुलेटेड व्हॅन, यांत्रिकीकरण बोट साठी अनुदान, १४ वित्त आयोग थेट लाभ, विमा, जलजिवन मिशन मधून १०० कोटी पेक्षा जास्त पैसा यातील ठाकरे गट काही ग्रामपंचायत मध्ये ही कोट्यावधी कामे सूरू तसेच महिलांना एसटी तिकीट सवलत, कोरोना काळात मोफत लस हे सर्व पंतप्रधान मोदी यांनी केले त्याचे श्रेय आम्ही घेणार. मोदी सरकारच म्हणणार. रस्ता व अन्य विकास साठी पैसे वेगळे. जे पंतप्रधान यांनी केले ते भाजप अर्थात मोदी यांनी केले म्हणणार.

विरोधी पक्ष आयुष्यमान भारत कॅम्प लावले तेव्हा चालते. तेंव्हा ठाकरे गट पदाधिकारी लाभ घेतात. वादळातही ठाकरे गटाने लाभ जास्त घेतला. चांदा ते बांदा लाभ ठाकरे गटाने जास्त घेतला. सर्वासामन्य जनता व विरोधी यांना न्याय दिला नाही. विरोधी पक्षाला निधी दिला नाही हे ठाकरे गटाने सत्तेत असताना राजकारण केले. त्यामुळे आता बोंबा मारू नये. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे श्रेय त्यांनाच मिळाले पाहिजे असे विजय केनवडेकर म्हणाले. हिंदू हृदय सम्राट हा बाळासाहेबांचा अभिमान भाजपने नेहमी जपला. मात्र उद्धव ठाकरे हिंदुत्व विरोधात काम केले. आमचा बाळासाहेब यांच्या बद्दल आदर आहे. राम मंदिर श्रेय रामभक्त, हिंदू आणि भाजप यांचे आहे. मोदी सरकार मुळेच राममंदिर झाले. हे ठाम वास्तव आहे. मात्र आम्हाला त्याचे राजकारण करायचे नाही. मात्र जे खरे आहे ते खरेच. असेही केनवडेकर म्हणाले.

ठाकरे सरकार काळात भाजप कार्यकर्त्यांवर जन आशीर्वाद व अन्य कार्यक्रमात अनेक खोट्या केसेस टाकल्या गेल्या. असे असताना आता कुडाळ मध्ये सरकारी कार्यक्रमात अडथळा आणल्यामुळे प्रशासनाच्या तक्रारीमुळे ठाकरे गटावर गुन्हे दाखल झाले म्हणून त्यांनी बोंबा मारू नये. असेही विजय केनवडेकर म्हणाले. ममुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना चुकीच्या पद्धतीने निधी मंजूर केला. त्याला स्थगिती मिळाली. या विरोधात ८४ आमदार न्यायालयात गेले. त्यावरील काही स्थगिती उठली. मात्र चुकीच्या कामावरील स्थगिती उठणार नाही कारण जे चुकीचे ते चुकीचे. असे विजय केनवडेकर म्हणाले.

ठाकरे गटाला स्मृतीभंश झाला आहे असे प्रतिपादन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले. भाजप युती सरकार मधील राज्य शासन, पालकमंत्री स्तरावर मंजूर झालेली सर्व कामे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार फंडातून झालेली कामे आ. वैभव नाईक आपले म्हणतं आहेत. आता खोटी पत्र देण्याचे थांबवून त्यांनी प्रत्येक काम आपले सांगण्याचा नवीन फंडा सुरु केला आहे.

मात्र जनता पूर्ण ओळखून आहे. या मतदारसंघात भाजप नेते निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली शासनाच्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणला आहे. विकास निधीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे. २०२४ ला निलेश राणे यांचा विजय निश्चित असून वैभव नाईक यांचे डिपॉजिट जप्त होईल असे धोंडी चिंदरकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'दिसेल ते विकास काम आपणच केले' असे दाखवायचा ठाकरे गटाचा नवीन फंडा असल्याचीही केली टीका..!

"होय…आम्ही 'मोदी सरकार' असेच संबोधणार" ; विजय केनवडेकर यांची स्पष्टोक्ती.

error: Content is protected !!