कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : आमदार वैभव नाईक यांनी आकेरी – हुमरस -साळगाव ग्रा. मा. ४८९ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी बजेट २०२१ – २२ मधुन २९ लाख रुपये मंजूर केले आहेत.त्याचबरोबर बजेट अंतर्गत झाराप गोडेवाडी रस्ता ग्रा. मा. ५०८ खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी ३४ लाख रु मंजूर केले आहेत आणि झाराप वॉर्ड क्र. १ गांवकरवाडी मुख्य रस्ता पासून शकूर महमद कालेलकर, यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे हि विकास कामे मंजूर केली आहेत. या विकास कामांचा भूमीपुजन सोहळा शुक्रवारी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले. यावेळी हुमरस येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी सभापती श्रेया परब, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि. प सदस्य राजु कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख अश्पाक कुडाळकर, बंड्या कुडतरकर, महेश जामदार, संर्या घाडी,कौशल जोशी, हुमरस माजी सरपंच अनुप नाईक, माजी उपसरपंच संतोष परब, ग्रामपंचायत सदस्य शलाका कविटकर,श्रेया मेस्त्री, ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश नाईक, शाखाप्रमुख शेखर देउलकर, युवासेना शाखाप्रमुख महेश वारंग, बाबी पाटकर,सुरेश कुडकर, गुरूदास घोगळे, संतोष तामाणेकर, विजय राऊळ,उमेश नाईक,शामप्रसाद कामत,मधुकर कुडकर,भरत वेजरे, सुनिता तेली, चंदा मेस्त्री, लक्ष्मी बापु राऊळ,अक्षय नाईक, संतोष शिरोडकर, सुनिल तेली, तुकाराम सावंत, सिमा सावंत,आशीष नाईक, निहाल नाईक, प्रणय कामत, गौरी देऊलकर, मोहन देऊलकर, मनोहर देऊलकर, समिर आकेरकर, विलास आकेरकर, उषा ठकार, दिपक वारंग, दिनेश सडवेलकर, नारायण वारंग,भाई वारंग, मयुर गुडेकर हुमरस गावातील शिवसैनिक युवासैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
झाराप वॉर्ड १ येथे सोहेल जद्दी शाखा प्रमुख, मोहसीन मुजावर,सरफराज आजगावकर, गणी आजगावकर, मुन्ना जद्दी, अरमान रिझवी, कासिफ बांदेकर, अफराज आजगावकर,नदीम कर्णेकर, आकिब आजगावकर, मुबारक मुजावर,जब्बार कालेलकर, समद कालेलकर, मुनोवरजहा राऊत,गुलजार कालेलकर,निसार कालेलकर, सत्तार कालेलकर,ताहीर कालेलकर, अनस आजगावकर, मुनाफ खान,खुतबुद्दीन जद्दी, चंदू मुडये आदी मुस्लिम वाडीतील ग्रामस्थ.
झाराप वॉर्ड २ येथे दादू गोडे, शाखाप्रमुख तुकाराम गोडे, भाई गोडे, ग्रा. प. सदस्य तनया मांजरेकर,ग्रा. प. सदस्य विशाखा गोडे, नामदेव आराडकर, नारायण आराडकर, अनिल गोडे, अभय गोडे, अर्चना कासकर, सतीश बोभाटे, नारायण वराडकर, शेखर रेडकर, प्रसाद गोडे, यज्ञेश गोडे, सुबोध गोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.