शिरगाव | संतोष साळसकर : महात्मा गांधीना, समाजाला बोधीत करण्यामागे एकच उद्देश होता, की, खेडे हा देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथम खेड्यांचा विकास केला पाहिजे. हा महात्मा गांधीजींच्या बोलण्याचा आशय असलेल्या संकल्पनेकडे जनतेनेच नाही, तर सरकारने सुद्धा दुर्लक्ष केलेला आज आपण पाहत आहोत. याचा शासनदरबारी विचार होण्यासाठी अधिकारी व राज्यकर्ते यांनी जोर धरावा. तरच २ ऑक्टोबर हा गांधी जयंती दिन खर्या अर्थाने देशहिताने साजरा होईल. असे मत श्रावण येथील पेंटर व सामाजिक कार्यकर्ते अण्णा पवार यांनी प्रसिध्द पत्रकामधुन मांडले.
खेड्यात उपजीविकेचे साधन नसल्याने, उद्योगधंदे उभारले तर खेड्यातील तरुणांचे, नोकरी प्रश्न सुटतील. नोकरीसाठी वणवण करत शहरांकडे जाणारा ओघ थांबेल. शहरांचे बिघडलेले वातावरण सुधारेल. खेड्यातील शाळांची पटसंख्या वाढेल. त्याचबरोबर तरुण आपल्या गावातच राहून शेती किंवा फळ लागवड करून आपल्या उपजीविकेच्या साधनांमध्ये आणखीनच भर घालून आर्थिक सुबत्ता आणतील. स्वतःची आर्थिक बाजू भक्कम करतील. त्याचबरोबर माळरानावर व डोंगर पठार किंवा उतारावर शेती केली तर पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. शिवाय वन्यप्राण्यांचा होणारा त्रास लोकांना कमी होईल. आणि वन्यप्राण्यांना खाद्य निर्माण झाल्याने वन्य प्राणी लोकवस्तीकडे वळणार नाही. पर्यायाने वन्य प्राण्यांचा व लोकांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या या रितीरिवाजाकडे शासनाने लक्ष घालून प्रथम खेड्यांचा विकास करावा. यासाठी स्थानिक कार्यकर्ते, सरपंच, आमदार, खासदार मंत्री यांनी संघटित होऊन विचार करावा. असे मत श्रावण येथील पेंटर अण्णा पवार यांनी, प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून जनतेसमोर मांडले आहे.
‘खेड्यांकडे वळा’ गांधीजींच्या या विचारांचा विचार होणार का? : अण्णा पवार
- Advertisement -
- Advertisement -