30 C
Mālvan
Monday, April 28, 2025
IMG-20240531-WA0007

रजतची ‘ब्राॅन्झ’ कामगिरी ; टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकरने टेबल टेनिसच्या विद्यापिठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत पटकावले कांस्य पदक.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याने टेबल टेनिस मध्ये राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत ब्राॅन्झ पदक पटकावले. या स्पर्धा भोपाळ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील विद्यापीठ यांचा समावेश होता. पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांचा यात समावेश होता.

रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम चार संघ यामध्ये स्थान मिळवले. कुमार रजत याने प्राथमिक फेरीतील सर्व सामने जिंकले आणि आपल्या संघालाअंतिम चार मध्ये स्थान मिळवून दिले. अंतिम चार संघा मध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरी चुरशीची झुंज देऊन कास्य पदक मिळवले.यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विद्यापीठीय स्पर्धे साठी झाली आहे. तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.

रजत हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स. का पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे तसेच शिक्षिका सौ. ज्योती बुवा तोरसकर यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगांवकर टेबल टेनिस अकादमी चे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक श्री.विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ. राहुल पंत वालावलकर, सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री. हेमंत वालकर आनि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. रजत तोरसकर च्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडू याना प्रोत्साहन मिळणार आहे आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल असे मत व्यक्त केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याने टेबल टेनिस मध्ये राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत ब्राॅन्झ पदक पटकावले. या स्पर्धा भोपाळ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील विद्यापीठ यांचा समावेश होता. पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांचा यात समावेश होता.

रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम चार संघ यामध्ये स्थान मिळवले. कुमार रजत याने प्राथमिक फेरीतील सर्व सामने जिंकले आणि आपल्या संघालाअंतिम चार मध्ये स्थान मिळवून दिले. अंतिम चार संघा मध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरी चुरशीची झुंज देऊन कास्य पदक मिळवले.यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विद्यापीठीय स्पर्धे साठी झाली आहे. तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.

रजत हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स. का पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे तसेच शिक्षिका सौ. ज्योती बुवा तोरसकर यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगांवकर टेबल टेनिस अकादमी चे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक श्री.विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ. राहुल पंत वालावलकर, सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री. हेमंत वालकर आनि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. रजत तोरसकर च्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडू याना प्रोत्साहन मिळणार आहे आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल असे मत व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!