मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रकार (११ ते १४ वयोगट मुली ) गोळा फेकमध्ये पळसंब शाळा क्र. १ ची कु. आर्या रविकांत सावंत हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला.तिची सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. माजी सरपंच व शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत गोलतकर यांनी कु. आर्या सावंत हिचे अभिनंदन केले आहे. कु. आर्याचे यश हे आपल्या गावांसाठी व शाळेसाठी भूषणावह आहे असे सांगत त्यांनी तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ( मोठा गट मुली) खो- खो या क्रीडा प्रकारात श्रावण क्र. १ शाळेतून खेळताना कु.आर्या व दिव्या लाड यांनीही चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन संघ विजेता ठरण्यास मोलाचे योगदान दिले त्याबद्दल दोघांचेही अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -