६ कोटी ९५ लाख ४५ हजार रु. निधीच्या ३५ रस्त्यांच्या कामांचा समावेश.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ६ कोटी ९५ लाख ४५ हजार रु. निधी मंजूर झाला होता. मात्र त्याच दरम्यान राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार निर्माण झाले. दरम्यान त्यांच्या मतदार संघातील सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. आमदार वैभव नाईक यांनी विद्यमान मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेऊन विकास कामांवरील स्थगिती उठविण्याची मागणी केली मात्र ते सरकारमध्ये सामील होत नसल्याने स्थगिती कायम ठेवण्यात आली होती. तसे सूतोवाच मंत्र्यांनी केले होते. त्यामुळे कुडाळ वासियांवर अन्याय झाला होता. शिंदे – फडणवीस सरकार विरोधात असलेल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. नाईलाजाने पक्षामार्फत त्यांना कोर्टात जावे लागले. मुंबई उच्च न्यायालयात विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या याचिका मान्य केल्या होत्या. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबतचे ऍफिडेव्हिट न्यायालयात सादर केले. न्यायालयाने याची दखल घेऊन शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवत सर्व विकास कामांवरील स्थगिती उठविली आहे. त्याबाबतचे परिपत्रक २९ सप्टेंबर २०२३ रोजी राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाकडून काढण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील ३५ रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठविली असून आमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. त्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. आता या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील मंजूर असलेली व स्थगिती उठविलेली विकास कामे पुढीलप्रमाणे.
डिगस किनलोस मार्ग इजिमा ४३ डांबरीकरण करणे १४ लाख २५ हजार, वालावल हुमरमळा, बिजोळेवाडी ग्रा. मा. ३३७ डांबरीकरण करणे १९ लाख, कवठी प्रजिमा ४५ देऊळवाडी अशांतवाडी ग्रामा ३३३ डांबरीकरण करणे १९ लाख, बिबवणे एनएच १७ पासून बिबवणे मंगलेवाडी वाडी वरवडे हरिजनवाडी ग्रामा ४०७ डांबरीकरण करणे १९ लाख, कुडाळ आकेरी गावडेवाडी मार्ग ग्रामा. डांबरीकरण करणे १९ लाख पावशी मिटक्याची वाडी माश्याची वाडी ग्रा. मा. २५९ डांबरीकरण करणे १९ लाख,
बाव मुख्य रस्ता ते वेताळ पणदूर गोळवणवाडी ग्रा. मा. २७९ डांबरीकरण करणे १९ लाख, आकेरी हुमरस साळगाव ग्रामा. ४८९ डांबरीकरण करणे १९ लाख चेंदवण देऊळवाडी ग्रामा. ३२४ डांबरीकरण करणे १९ लाख नेरूर चौपाटी ते कांडरी वाडी वालावल मुडतुल कोठारेवाडी ग्रामा. ३१२ डांबरीकरण करणे १९ लाख
पूळास निकम टेंब ग्रा. मा. २१३ डांबरीकरण करणे १९ लाख
आंबडपाल भद्रकाली देवालय मार्ग ग्रामा ४१४ डांबरीकरण करणे १९ लाख, पुळास दुकानवाडा ग्रामा. २०८ डांबरीकरण करणे १९ लाख, प्रजीमा ४० ते मुळदे मधलीवाडी ग्रामा . ४१७ डांबरीकरण करणे ९ लाख ५० हजार, आकेरी हुमरस साळगाव ग्रामा४८९ मध्ये डांबरीकरण करणे १९ लाख शिरवल कुपवडे इजिमा २७४ डांबरीकरण करणे – ४७ लाख ५० हजार डिगस किणकोस इजिमा ४३ डांबरीकरण करणे – २८ लाख ५० हजार कुंदे हरिजन भटवाडी ग्रामा ८३ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार कुपवडे गवळवाडी तोरबवाडी ग्रामा २० डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार
पोखरण खालचीवाडी टेंबवाडी ग्रामा ७२ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार ओरोस मुख्य रस्ता ते सुलोचना नगर ग्रामा ८१ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार कसाल मर्नलवाडी ग्रामा ९७ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार
पडवे चिरेखान मार्ग ग्रामा १०४ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार गावराई तेलीवाडी, थळकरवाडी, कुळकरवाडी, टेंबवाडी, बौद्धवाडी ग्रामा ११३ डांबरीकरण करणे – १९ लाख
ओरोस बु. ख्रये देवभाटले सावंतवाडा ग्रामा ८२ डांबरीकरण करणे – १९ लाख भडगाव खुर्द ब्राम्हणवाडी ५८ डांबरीकरण करणे – १९ लाख पांग्रड काजीमाचे टेंब ग्रामा ३६ डांबरीकरण करणे – १९ लाख
कडावल तावडेवाडी ग्रामा ४६ डांबरीकरण करणे – १९ लाख
आंब्रड तळेवाडी परबवाडी ग्रामा ८८ डांबरीकरण करणे – १९ लाख
आवळेगाव रा मा १७९ या रस्त्यावरील टेंबवाडी दाबटेवाडी ग्रामा १३२ डांबरीकरण करणे – १९ लाख घोटगे सोनवडे कळसुली लाडवाडी दुर्गनगर ग्रामा ९ डांबरीकरण करणे – १९ लाख
पांग्रड इजिमा ४२ ला जोडणारा पांग्रड ते विडीचे गाळू मार्ग ग्रामा ३७ डांबरीकरण करणे – १९ लाख भडगाव बु रामा १७९ डिगळवाडी मार्ग ग्रामा ५७ डांबरीकरण करणे – १९ लाख
आवळेगाव कुंभारवाडी मार्ग ग्रामा १३३ डांबरीकरण करणे – १९ लाख आडेली झाराप साळगाव माणगाव इजिमा ५३ डांबरीकरण करणे – ४७ लाख ५० हजार रु. या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली असून कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.