बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा मराठा समाज व आस्था लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबिर व शुगर तपासणी शिबिर उद्या २९ व परवा ३०डिसेंबरला सकाळी ९ ते १२:३० वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आले आहे .मातृत्व मेडिकल स्टोअर्स, काळसेवाडी, बांदा पोस्ट ऑफिस जवळ, जुना मुंबई गोवा हायवे रोड येथे हे शिबीर संपन्न होईल. हे शिबिर सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर चेतना गांवकर ह्या रुग्णांना मार्गदर्शन व सल्ला देणार आहेत.
सदर शिबिरात रक्त सीबीसी मधील ११ टेस्ट
हिमोग्लोबिन, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट
रक्तातील साखरेचे प्रमाण वजन उंची,बी.एम.आय ब्लड प्रेशर तपासणी करून रुग्णांना डॉक्टर मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे सदर तपासणी ही सर्वांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. बांदा मराठा समाजामार्फत गेली आठ वर्ष अनेक नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व रुग्णांसाठी अशा प्रकारचे मोफत तपासणी शिबिर प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन बांदा मराठा समाज अध्यक्ष श्री विराज परब व सचिव आनंद वसकर यांनी केले आहे.