शिरगाव|संतोष साळसकर : लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपेरेटीव्ह बँक,आचरा यांचे वतीने,नवदुर्गा सन्मान उपक्रमांतर्गत यावर्षीचा पुरस्कार, बांदिवडे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापीका व सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. सुनिता गोविंद प्रभू यांना प्रदान करण्यात आला. सदर सन्मान सोहळा श्रीम. सुनिता प्रभू यांचे घरी, शाखेचे व्यवस्थापक श्री मोरवेकर यांचे उपस्थितीत विजया दशमीदिनी संपन्न झाला.
सदर बॅंकेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यावर्षी आचरा शाखेच्या वतीने बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. सुनिता गोविंद प्रभू यांची निवड करण्यात आली. श्रीम. सुनिता प्रभु यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापुर तालुक्यात सावडाव व पाचल येथे तर सिंधुदुर्गात बांदिवडे पालयेवाडी शाळेत सेवा बजावली. देशाच्या भावी नगरीकांना सुशिक्षित करतानाच, त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाबरोबरच सामाजिक कार्यही केले. त्याचेच हे फळ असल्याचे प्रभु मॅडम आपल्या मनोगतात म्हणाल्या.
या कार्यक्रमास शाखेचे व्यवस्थापक श्री मोरवेकर, श्रीम.अस्मिता गावकर, हिमानी परब, श्री. विनोद आचरेकर, श्री. मिराशी, बांदिवडे गावचे मानकरी संजीव प्रभू, आप्पा प्रभु, आडवली सुभाष विद्यालय शिक्षिका सौ. सुजाता रंजन प्रभू , मसुरे शाळेचे केंद्र प्रमुख देशमुख सर, संजय जोशी, विश्वनाथ परब व प्रभू कुटुंबीय उपस्थित होते. शाखेच्या वतीने श्रीम. प्रभू यांना शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
सर्वप्रथम उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक श्री मोरवेकर यांनी केले. यावेळी बांदिवडे वाचनालयाचे ग्रंथपाल विश्वनाथ परब यांनी सर्वांचे आभार मानले.