कणकवली | उमेश परब : कणकवली महावितरण कार्यालयात कणकवली भाजपा शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी अभियंत्यांशी चर्चा केली. गणेश उत्सवाच्या काळात वीज ग्राहकांना वसुली साठी तगादा लावू नये तसेच वीज तोड करू नये,कोविड मुळे सर्वांचे व्यवसाय अडचणीत असून टप्प्याटप्प्याने वसूली करावी,त्याच प्रमाणे गणेशोत्सव जवळ येत असून गणेश मूर्ती शाळा मोठ्या प्रमाणात असून डागडुजी च्या नावाखाली लाईट बंद करू नये अन्यथा मूर्तींचे रंगकाम करणारे मूर्तीकार अडचणीत येऊ शकतात,तसेच कलमठ,वरवडे, पिसेकामते आदी भागात सातत्याने वीज खंडित होत आहे.
ओसरगाव वागदे, बोर्डवे ,कळसुली, हळवळ,लोरे गावात वारंवार जाणारी लाईट,लाईन वरील झाडी तोडणे,ट्रान्सफॉर्मर ,गंजलेले पोल बदलणे,या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर येणाऱ्या काही दिवसात या संदर्भात बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे मोहिते यांनी सांगितले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सभापती मनोज रावराणे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेवक शिशीर परूळेकर, युवा मोर्चा चे संदीप मेस्त्री, प्रदीप गावडे,पप्पू पुजारे,सदा चव्हाण, करंजे सरपंच मंगेश तळगावकर,प्रदीप ढवण, कळसुली उप सरपंच सचिन पारधीये,गौरव यादव,पंकज सावंत,निखील आचरेकर,उपस्थित होते