27.2 C
Mālvan
Saturday, April 26, 2025
IMG-20240531-WA0007

मुंबई गोवा महामार्गावर डंपर पलटी..!

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोर आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक ( एम एच ०७ सी ६१५४ ) पलटी झाला. आ अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हायवे ट्राफिकचे पोलीस तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.

या अपघातात प्रसाद आहेर ( वय २१ तळेबाजार ), किशोर जंगले ( वय ३० पिसेकामते ), दिलीप शेलार ( वय ५५ नांदगांव ) हे किरकोळ जखमी झाले. अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र झालेली दुखापद ही किरकोळ स्वरूपाची असल्याने त्यांना औषधोपचार करून पाठविण्यात आले.

मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाताना जनावर आडवे आल्याने त्या जनावराला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. त्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात ताब्यातील ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघात प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. वंजारे हे पुढील तपास घेत आहेत..

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोर आज सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक ( एम एच ०७ सी ६१५४ ) पलटी झाला. आ अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हायवे ट्राफिकचे पोलीस तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.

या अपघातात प्रसाद आहेर ( वय २१ तळेबाजार ), किशोर जंगले ( वय ३० पिसेकामते ), दिलीप शेलार ( वय ५५ नांदगांव ) हे किरकोळ जखमी झाले. अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र झालेली दुखापद ही किरकोळ स्वरूपाची असल्याने त्यांना औषधोपचार करून पाठविण्यात आले.

मुंबई - गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाताना जनावर आडवे आल्याने त्या जनावराला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. त्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात ताब्यातील ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघात प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. वंजारे हे पुढील तपास घेत आहेत..

error: Content is protected !!