23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात ; आरोग्यमंत्र्यांच्या ताफ्यात नव्हती रुग्णवाहिका..!

- Advertisement -
- Advertisement -

कोल्हापूर | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याचा कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आज २४ डिसेंबरला दुपारी रत्नागिरी-कोल्हापूर मार्गांवरील रजपूतवाडी येथे हा अपघात घडला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक रवीराज जाधव हे मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांनाही कोणतीही दुखापत झाली नाही असे सूत्रांकडून समजते आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर तानाजी सावंत हे श्री देव ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिका नसल्याचेही सूत्रांकडून समजते आहे. तानाजी सावंत यांच्या ताफ्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही रुग्णवाहिका सहभागी नव्हती. दरम्यान ज्या दोन गाड्या एकमेकांना आदळल्या त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कोल्हापूर | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याचा कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आज २४ डिसेंबरला दुपारी रत्नागिरी-कोल्हापूर मार्गांवरील रजपूतवाडी येथे हा अपघात घडला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक रवीराज जाधव हे मात्र किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांनाही कोणतीही दुखापत झाली नाही असे सूत्रांकडून समजते आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर तानाजी सावंत हे श्री देव ज्योतिबा दर्शनासाठी जात होते. यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिका नसल्याचेही सूत्रांकडून समजते आहे. तानाजी सावंत यांच्या ताफ्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही रुग्णवाहिका सहभागी नव्हती. दरम्यान ज्या दोन गाड्या एकमेकांना आदळल्या त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
.

error: Content is protected !!