हाॅटेल खोत दरबार येथे फक्कड ‘केसरी चहा’ व शेतकर्यांकडून थेट येणारा स्थानिक कोकणी खाद्य मेवासुद्धा एकाच छताखाली उपलब्ध.
विविध स्तरांतील मान्यवर उद्घाटनाला उपस्थित.
मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बंदर जेटीजवळील चॅपेल समोर आज २४ डिसेंबरला ‘हाॅटेल खोत दरबारचे’ शानदार उद्घाटन झाले. सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या या नवीन हाॅटेल आस्थापनाच्या उद्घाटन प्रसंगी विविध स्तरांतील व्यक्ती व मान्रवर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांनी खोत परिवाराच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. शिल्पा यतीन खोत व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांची संकल्पना असलेल्या ‘खोत दरबार’ हाॅटेल मध्ये जेवण, नाष्टा, शीतपेये, मालवणी, चायनीज, पंजाबी, तंदूरी, पिझ्झा, शोर्मा वगैरे खाद्य पदार्थांसोबतच बचत गटांना प्रोत्साहन व रोजगार देऊन विविध स्थानिक उत्पादनांचा विशेष काऊंटरही सुरु करण्यात आला असून त्यात काजू, कोकम, लोणची, आंबा पल्प व इतर अनेक कोकणी मेवा सुद्धा ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध झाला आहे. खोत दरबार मधील सुप्रसिद्ध ‘केसरी चहा’ व कोकणी मेवा खरेदी साठी आज पहिल्याच दिवशी ग्राहकांची जोरदार झुंबड देखील उडत आहे.
या उद्घाटन सोहळ्याला आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व त्यांच्या पत्नी सौ. स्मृती महेश कांदळगांवकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उमेश मांजरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, प्रसाद आडवणकर, आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, माजी नगरसेवक महेश जावकर, यशवंत गांवकर, सिद्धेश मांजरेकर, भाई कासवकर सिद्धेश चव्हाण, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अनिकेत आचरेकर, वेंगुर्ले येथील प्राणीमित्र चेतन वेंगुर्लेकर उपस्थित होते. यतीन खोत यांच्या मातोश्री सौ. पूनम खोत, कन्या तनिष्का व मुलगा स्वराज यांची उद्घाटनाला विशेष उपस्थिती होती.
या उद्घाटन सोहळ्याला यतीन खोत मित्रमंडळ व सौ शिल्पा यतीन खोत यांच्या महिला मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रतिभा चव्हाण, चारुशीला आढाव, निनाक्षी मेथर, स्वाती तांडेल, शांती तोंडवळकर, दीपा पवार, दीपा शिंदे, नंदा सारंग, आर्या गांवकर, कल्पिता जोशी, गीता खोत, श्रद्धा पेडणेकर व इतर जणींनी सौ. शिल्पा यतीन खोत व यतीन खोत यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी उपस्थित राहून सदिच्छा दिल्या.