आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्य चिंदर गावचे दैवत देवी भगवती माऊलीची दिंडे जत्रा २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत.
यात्रेनिमित २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. यात्रेकरू भाविकांचे स्वागत, भगवती-माऊली दर्शन, दुपारी १२ ते १ वा. देवी भगवती-माऊलीस मानकरी यांचा महाप्रसाद, रात्री ११ वा देव रामेश्वर मंदिर ते देवी भगवती मंदिर ग्राम देवतांच्या तरंगांचे ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत आगमन, पहाटे ३ वा. पुराण, गोंधळ, कीर्तन व दिडे जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीचे दिवट्या नृत्य, बुधवार, २७ रोजी सायंकाळी ५.३० वा. देव रामेश्वर भजन मंडळ, देऊळवाडी, ६.३० वा. देव तेरई ब्राह्मण मंडळ, तेरईवाडी, ७.३० वा. गोपीकृष्ण गुरुकुल, भांडूप मुंबईचे बुवा गोपीनाथ बागवे यांचे भजन, रात्री ९ नंतर पुराण, गोंधळ, कीर्तन व श्रींची आरती. २८ रोजी सायंकाळी ४ वा. सिद्धेश्वर भजन मंडळ, सडेवाडी, ५.३० वा. गांगेश्वर मंडळ, पा पालकरवाडी, ६.३० वा. रवळनाथ भजन मंडळ, कुंभारवाडी, ७.३० वा. देव वाडत्री ब्राह्मण भजन मंडळ, अपराज-
कोंडवाडी यांचे भजन, रात्री ९ नंतर पुराण, गोंधळ, कीर्तन व श्रींची आरती, २९ रोजी सायंकाळी ५.३० वा. देव ब्राह्मण भजन मंडळ, लब्देवाडी, ६.३० वा. देव ब्राह्मण भजन मंडळ, साटमवाडी, ७.३० वा. देव आकारी ब्राह्मणदेव भजन मंडळ, गावठणवाडी यांचे भजन. रात्री ९ नंतर पुराण, गोंधळ, कीर्तन व आरती. ३० रोजी दुपारी ३ ते ६ चालू वहिवाटदार सर्व महिला अर्चना, अनिता, सुनिता, अंकिता घाडी यांच्यामार्फत हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ६ वा. देव
पिसाळी ब्राह्मण भजन मंडळ, तेरई, ७ वा. भगवती भजन मंडळ, भटवाडी यांचे भजन. रात्री ९ वा. पुराण वाचन, १० वा. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुरचा ‘पराशक्ती दहन’ अर्थात ‘भावई महिमा’ नाट्यप्रयोग (स्थळ : देवी भगवती रंगमंच, सौजन्य वाळू गृप चिंदर), मध्यरात्री २.३० नंतर गोंधळ, कीर्तन व श्रीचीं लळीत समाप्ती, आरती, दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होतील. या संपूर्ण ‘दिंडे’ जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारापाच मानकरी व देवी भगवती-माऊली सेवा समिती, चिंदर यांनी केले आहे.