देऊळवाडा आडवण मायनर ब्रिज ४६ लाख ३७ हजार आणि देऊळवाडी स्मशानभूमी नूतनीकरणासाठी १६ लाख ९७ हजार रु निधी.
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नगरोत्थान योजनेमधून देऊळवाडा आडवण येथे मायनर ब्रिज बांधणे यासाठी ४६ लाख ३७ हजार रु. व देऊळवाडी स्मशानभूमी नूतनीकरण करणे व शेड बांधणे यासाठी १६ लाख ९७ हजार रु. एवढा निधी मंजूर केलेला आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याबद्दल देऊळवाडा व आडवण वासियांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण,उपशहर प्रमुख यशवंत गावकर, भाई कासवकर, नीना मुंबरकर, शाखा प्रमुख किशोर गांवकर, मोहन मराळ, मनोज मोंडकर, उमेश चव्हाण, गणेश चव्हाण, चिंट्या गोलतकर, बाळा हिंदळेकर, श्री. भोसले, दिगंबर बगाड, गजानन साळगावकर, उत्सुक गावकर, सौ. मराळ, सिद्धेश मांजरेकर, स्वप्नील आचरेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.