बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल च्या एम. एस. एफ. सी. विभागाची क्षेत्रभेट पडवे माजगाव येथील वनसंशोधन उपकेंद्रत नुकतीच नेण्यात आली. व्हि.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा मधील शेती पशुपालन या विभागांमध्ये शेती विषयक प्रात्यक्षिक घेण्यात येतात. या विषयाचा एक भाग म्हणून ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यानी विविध औषधी वनस्पतींचा अभ्यास केला. या वनस्पतीच्या लागवडीविषयी तसेच या वनस्पतींचा मनुष्याच्या कोणत्या आजारावर औषध म्हणून उपयोग होतो या संदर्भातील माहिती वनरक्षक सौ. दीप्ती मोर्ये त्यांच्याकडून घेतली.
जवळपास ३० ते ३५ विविध वनऔषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली. तसेच या वनसंशोधन उपकेंद्रामधील विविध झाडांची माहिती त्यापासून मिळणाऱ्या फळांची, विविध उपयोग याची माहिती सुद्धा देण्यात आली. इयत्ता आठवी मधील १५ विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीमध्ये सहभाग घेतला होता.
या क्षेत्रभेटीमध्ये प्रशाळेच्या मुख्याध्यापीका सौ. मनाली देसाई, शेती विभागाच्या निदेशिका सौ. गायत्री देसाई, गृह आरोग्य विभागाच्या निदेशिका सौ. रिया देसाई, ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक श्री.भूषण सावंत, एम.एस. एफ. सी. विभागाचे समन्वयक तथा अभियांत्रिकी विभागाचे. निदेशक श्री राकेश परब यांनी सहभाग घेतला होता. या क्षेत्रभेटीसाठी श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन श्री. मंगेश कामत त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.