मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून उद्या २३ डिसेंबरला आधार कार्ड विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धुरीवाडा सागरी महामार्ग येथील हाॅटेल स्वरा येथे हे शिबीर सकाळी १० वाजता सुरु होत असून आधार कार्ड विषयक मोबाईल लिंक, अपुर्या जन्मतारीख, पत्ता बदलणे तथा बायोमेट्रीक अद्ययावत करणे यासाठी हे विशेष शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
या शिबीरासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
मतदान कार्ड.
पनकार्ड.
पासपोर्ट.
शाळा सोडल्याचा दाखला.
सर्व्हिस ओळखपत्र , शासकीय
ड्रायव्हिंग लायसन्स.
पासबुक.
शाळा ओळखपत्र ( यापैकी कोणताही एक ).
पत्ता पुरावा –
मतदान कार्ड.
बँक पासबुक.
लाईटबिल …( ३ महिन्याच्या आत)
इन्शुरन्स पॉलिसी
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट फोटो
पाण्याचे बिल (३ महिन्याच्या आत)
(यापैकी कोणतेही)
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.