बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा हायस्कुलच्या १९९५-९६ च्या १०वी च्या वर्गाचा ‘मैत्र जीवांचे’ हा स्नेहमेळवा,आरोंदा हायस्कूल च्या सभागृहात आयोजित करण्यात आला. स्नेहमेळ्याव्याची सुरुवात शाळेची घंटा देऊन, शाळेच्या पटांगणात स्नेहमेळ्याव्यातील माजी विध्यार्थी, माजी शिक्षकवृंद, प्रशालेचे विद्यमान प्राचार्य व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या खड्या आवाजात श्री. डी एन पाटील यांनी राष्ट्रगीतासाठी सूचना दिली. राष्ट्रगीत झाल्यावर दिवंगत माजी शिक्षक, विद्यार्थी व सेवक वर्गाला श्रद्धांजली वाहून त्यांच्या त्यांच्या कार्यास मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन हे,संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.गोपाळजी नाईक व हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. सिद्धार्थ तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून करण्यात आले. सर्व माजी शिक्षक यात माजी मुख्याध्यापक श्री.सौदागर सर,माजी मुख्याध्यापक श्री धर्णे सर, श्री. राणे सर, श्री ए.के. नाईक सर , श्री देसई सर , श्रीमती पाटकर मॅडम , श्रीमती देसाई मॅडम , श्रीमती धानजी मॅडम, शिपाई श्री रवी नाईक यांना शाल,श्रीफळ व भेटवस्तू देवून सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आले.
दिवंगत शिक्षक, दिवंगत माजी शिपाई यांना ही मरणोत्तर सत्कार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलवून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुलांना प्रथमिक संगणक ज्ञान मिळावे या हेतूने या संपूर्ण बॅच कडून दोन संगणक संच शाळेस भेट म्हणून देण्यात आले. दुपारी स्नेह् भोजनाचा कार्यक्रम संपताच मनोरंजनात्मक कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यात वृंदा नवार हिने कविता गायन, परेश पांढरे याने प्रवाद वर्णन, सदानंद याने अनुभव कथन,सचिन आईर याने योगा प्रात्यक्षिक करून दाखवले,सचिन मोठे याने स्वराचित विनोदी पूर्वनुभवावर मालवणी कविता सादर केली. विशेष म्हणजे तांबे सर आणि धर्णे सर यांनी सुमधुर आवाजात गीते सादर केलीत. या स्नेहमेळाव्यात संदीप मातोंडकर,विकास सावंत,परेश पांढरे, रमेश साळगावकर,विमल नाईक,नरेश जाधव,रुपेश गडेकर सुनीलता साळगावकर,आना साळगावकर सिद्धार्थ केरकर, तातोबा कुडव,गुरु नाईक,सचिन नाईक ( किनळे ), सुवर्णा मणेरीकर, सुरेखा पेडणेकर, मंगल येडवे, रसिका नाईक, सुप्रिया सातोसकर, वैशाली सौदागर, नयना केरकर, दर्शिका शिवलकर, संतोष पेडणेकर, सुनीता पेडणेकर, नीलिमा चोडणकर, गोविंद नाईक,सुषमा कांबळी, कल्पेश मुंज, राखी कुबल, नाना घाटवळ,आनंद नाईक,सखाराम मोठे,आंतोन फर्नांडीस,विशाल नाईक,स्वाती मठकर,सचिन नाईक ( आग्राळवाडी )व स्वस्तिक कांबळी इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते. पूनम तानावडे, अनिल दाभोलकर व् रेश्मा धरणे यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक संदीप पेडणेकर यांनी केले ,उदघाटन सत्राचे आभार सदानंद कांदळकर व संपूर्ण कार्यक्रमाचे आभार वृंदा नवार हिने तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर जाधव यांने केले