बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ग्रामपंचायत व रुक्मिणी सुपर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ३४० रुग्णांनी लाभ घेतला. तर ३२४ रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर तोरसे (गोवा) येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमा खडपे, रुक्मिणी सुपर बाजारचे संचालक विजय तोरसकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, सौ. रुपाली शिरसाट, सौ. श्रेया केसरकर, सौ. तनुजा वराडकर, प्रशांत बांदेकर, सौ. देवल येडवे, सौ. दिपलक्ष्मी पटेकर, साईश तोरसकर, शैलेश केसरकर, सुशांत ठाकूर, रमेश बुठे, सुनील धुरी आदी उपस्थित होते.
या शिबिरात दिवसभरात ३४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३२४ रुग्णांना तीन हजार रुपये किमतीचा चष्मा १६० रुपये किमतीत वितरित करण्यात आला. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितले की ग्रामपंचायतच्या वतीने अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रुक्मिणी सुपर बाजारच्या सहकार्याने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विजय तोरसकर यांनी आभार प्रदर्शन केले.