23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचा संताप ; नगरपरिषद प्रशासकांची मनमानी अशीच चालू राहिली तर आंदोलनाचा दिला इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

नगरपरिषद सभागृह नूतनीकरण कार्यक्रमाला माजी लोकप्रतिनिधींचा कसा काय विसर पडू शकतो असा सवाल करत न. प. चा नवीन जेसिबी म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी बाराण्याचो मसालो’ असल्याची केली टीका ; दिव्यांग निधी वितरणाचा ‘इव्हेंट ‘केल्याची टीका करत व्यक्त केली खंत.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या नूतन सभागृहाचे नुकतेच १६ डिसेंबरला उद्घाटन झाले. या नंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला व प्रशासक यांना धारेवर धरत अनेक प्रश्न विचारले असून त्या उद्घाटन सोहळ्याबाबत प्रसिद्धी पत्राद्वारे अनेक पैलूंकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला आहे.

महेश कांदळगांवकर यांनी म्हणले आहे की मालवण नगर परिषद सभागृहाचे तात्पुरते नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचा समारंभ सिने कलावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मराठी सिने कलावंत उपस्तित राहणे हे भूषणावह होते पण मालवणच्या विकासासाठी गेली कित्येक वर्ष ज्या माजी लोकप्रतिनिधीनी याच सभागृहात बसून जनतेसाठी काम केले त्यांना या कार्यक्रमाला सोयीस्कर विसरण्यात आले ही संताप जनक बाब आहे. अशी कोणती आणिबाणीची परिस्तिथी होती की काम अर्धवट असताना
हा कार्यक्रम उरकण्यात आला असाही सवाल त्यांनी केला आहे. आमदार, खासदार यांचे अधिवेशन सुरु आहे ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी होती का आणि जर उदघाटन करायाचेच होते तर विद्यमान खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या तारखा घेणे व नंतर त्यानुसार सोहळा आयोजीत करणे हे आवश्यक होते. वास्तवीक पाहता नगरपरिषदे मध्ये विकासाचे सर्व निर्णय याच सभागृहातून घेतले जातात आणि या सभागृहात येण्यासाठी अनेकांची राजकीय मनिषा असते सबब असे हे सभागृह आकर्षक आणि सर्व सोयी सुविधा युक्त असावे यासाठी आमच्या कालावधीमध्ये आमच्या न. प. चे अर्किटेक निकम यांच्या कडून या सभागृहाचे सुमारे ५० लाख रुपयाचे अंदाजपत्रक करून घेतले होते. पण याच कालावधीत कोरोनाच संकट आले. यावेळी शासनाने वैद्यकीय कामासाठी निधींना प्राधान्य दिल्याने विकास कामांसाठी कमी निधी दिला गेला त्यामुळे त्यावेळी हा प्रस्ताव पाठवला गेला नव्हता. दरम्यान आमचा कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्या नंतर प्रशासकीय कालावधी सुरु झाला. जर सभागृह नूतनीकरण करण्याचं होत तर या कालावधीत हा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्या बाबत कुठलीही कार्यवाही का केलेली नाही. आमच्या कालावधीत सभागृह नादुरुस्त असताना भविष्यात एक चांगले सभागृह होणार या भावनेतून सर्वच लोकप्रतिनिधिनी याच सभागृहात बसून कामकाज केले होते. आमचा कालावधी संपून आता दोन वर्षे कालावधी झाला तरी निवडणूकाझालेल्या नाहीत आणि भविष्यात केंव्हा होणार याची अनिश्चितता आहे. त्यामुळे या कालावधीत एक परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे करून निधी मिळविण्याचा प्रयत्न न करता आणि सध्या सभागृहाचा वापर नसताना घाईघाईने मनमानी प्रमाणे सभागृहाला लाखो रुपयाची मलम पट्टी करण्यामागच अर्थकारण काय ही गोष्ट आकलन होणारी नाही असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नमूद केले आहे. निवडणुकी नंतर लोकप्रतीनिधि मार्फत जर या सभागृहाला निधी उपलब्ध केला गेला तर हा तात्पुरता केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याचीही शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

नवीन जे सी बी संदर्भात महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे की मालवण शहराच्या साफसफाई साठी सुमारे २७ लाख रुपयाचा जेसिबी खरेदी करण्यात आला आहे. आमच्या कालावधीत सुद्धा हा निधी प्राप्त होता , पण याच्या दुरुस्ती देखभाल, ऑपरेटर पगार, डिझेल याच्या साठी वर्षाला सुमारे सात ते आठ लाख खर्च होणार असल्याने आणि त्यापेक्षा लाख दीड लाख रुपये भाड्या पोटी खर्च करणे परवडणारे असल्याचे आमच्या लोकप्रतिनिधींचे मत झाल्याने आम्ही जेसिबी खरेदी केला नव्हता. त्यामुळे नवीन खरेदी केलेल्या जेसिबी च्या खर्चाचे नियोजन कसे केले जाणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण शहर सफाईसाठी मात्र स्वतः कचरा गाड्या खरेदी न करता भाड्याच्या गाड्या घेऊन काम केले जात आहे तर मग नवीन जेसिबी खरेदी करणे हा विरोधाभास नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. मालवण शहराच्या स्वछते साठी हा लाखो रुपयाचा जेसिबी घेतला आहे तर मग मागील दीड वर्ष सुमारे २५ लाख खर्च करून घेतलेल्या कचरापासून खत निर्मितीच्या मशीन बंद आहेत आणि याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या सुरु करण्या साठी जेसिबी खरेदी इतकी तत्परता का दाखवली गेली नाही याचेही कारण कळणे आवश्यक आहे असे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.

या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात अपंग निधी वितरणाचा ‘इव्हेंट’ वितरण झाला असे सांगत त्याबाबत महेश कांदळगांवकर यांनी खंत व्यक्त केली असून दरवर्षी अपंगांना न. प. निधीच्या ५% अपंग निधी दिला जातो आणि तो त्यांच्या हक्काचा निधी आहे. इतके वर्ष हा निधी त्यांच्या खात्यात परस्पर जमा केला जात आहे. पण कालच्या सभागृह नूतनीकरण कार्यक्रमात अपंगाना निमंत्रीत करण्यात आले. त्यांना चेक देतानाचे फोटो काढून प्रसिद्ध करण्यात आले. जे ज्यांच्या हक्काचे आहे ती मदत केल्याचे भासवून अपंगाच्या निधीचा असा इव्हेंट करण्यात आला हे अशोभनीय आहे असे म महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.

मागील दीड वर्ष या नगरपरिषद प्रशासकाच्या एकाधिकारशाही आणि मनमानी कारभारा विरुद्ध आवाज उठवूनही यावर कोणाचाही अंकुश नाही ही बाब सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्तिथी राहणार असेल भविष्यात याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेणे भाग पडणार आहे असा इशारा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नगरपरिषद सभागृह नूतनीकरण कार्यक्रमाला माजी लोकप्रतिनिधींचा कसा काय विसर पडू शकतो असा सवाल करत न. प. चा नवीन जेसिबी म्हणजे 'चार आण्याची कोंबडी बाराण्याचो मसालो' असल्याची केली टीका ; दिव्यांग निधी वितरणाचा 'इव्हेंट 'केल्याची टीका करत व्यक्त केली खंत.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या नूतन सभागृहाचे नुकतेच १६ डिसेंबरला उद्घाटन झाले. या नंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला व प्रशासक यांना धारेवर धरत अनेक प्रश्न विचारले असून त्या उद्घाटन सोहळ्याबाबत प्रसिद्धी पत्राद्वारे अनेक पैलूंकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला आहे.

महेश कांदळगांवकर यांनी म्हणले आहे की मालवण नगर परिषद सभागृहाचे तात्पुरते नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचा समारंभ सिने कलावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मराठी सिने कलावंत उपस्तित राहणे हे भूषणावह होते पण मालवणच्या विकासासाठी गेली कित्येक वर्ष ज्या माजी लोकप्रतिनिधीनी याच सभागृहात बसून जनतेसाठी काम केले त्यांना या कार्यक्रमाला सोयीस्कर विसरण्यात आले ही संताप जनक बाब आहे. अशी कोणती आणिबाणीची परिस्तिथी होती की काम अर्धवट असताना
हा कार्यक्रम उरकण्यात आला असाही सवाल त्यांनी केला आहे. आमदार, खासदार यांचे अधिवेशन सुरु आहे ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी होती का आणि जर उदघाटन करायाचेच होते तर विद्यमान खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या तारखा घेणे व नंतर त्यानुसार सोहळा आयोजीत करणे हे आवश्यक होते. वास्तवीक पाहता नगरपरिषदे मध्ये विकासाचे सर्व निर्णय याच सभागृहातून घेतले जातात आणि या सभागृहात येण्यासाठी अनेकांची राजकीय मनिषा असते सबब असे हे सभागृह आकर्षक आणि सर्व सोयी सुविधा युक्त असावे यासाठी आमच्या कालावधीमध्ये आमच्या न. प. चे अर्किटेक निकम यांच्या कडून या सभागृहाचे सुमारे ५० लाख रुपयाचे अंदाजपत्रक करून घेतले होते. पण याच कालावधीत कोरोनाच संकट आले. यावेळी शासनाने वैद्यकीय कामासाठी निधींना प्राधान्य दिल्याने विकास कामांसाठी कमी निधी दिला गेला त्यामुळे त्यावेळी हा प्रस्ताव पाठवला गेला नव्हता. दरम्यान आमचा कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्या नंतर प्रशासकीय कालावधी सुरु झाला. जर सभागृह नूतनीकरण करण्याचं होत तर या कालावधीत हा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्या बाबत कुठलीही कार्यवाही का केलेली नाही. आमच्या कालावधीत सभागृह नादुरुस्त असताना भविष्यात एक चांगले सभागृह होणार या भावनेतून सर्वच लोकप्रतिनिधिनी याच सभागृहात बसून कामकाज केले होते. आमचा कालावधी संपून आता दोन वर्षे कालावधी झाला तरी निवडणूकाझालेल्या नाहीत आणि भविष्यात केंव्हा होणार याची अनिश्चितता आहे. त्यामुळे या कालावधीत एक परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे करून निधी मिळविण्याचा प्रयत्न न करता आणि सध्या सभागृहाचा वापर नसताना घाईघाईने मनमानी प्रमाणे सभागृहाला लाखो रुपयाची मलम पट्टी करण्यामागच अर्थकारण काय ही गोष्ट आकलन होणारी नाही असेही माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी नमूद केले आहे. निवडणुकी नंतर लोकप्रतीनिधि मार्फत जर या सभागृहाला निधी उपलब्ध केला गेला तर हा तात्पुरता केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याचीही शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

नवीन जे सी बी संदर्भात महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे की मालवण शहराच्या साफसफाई साठी सुमारे २७ लाख रुपयाचा जेसिबी खरेदी करण्यात आला आहे. आमच्या कालावधीत सुद्धा हा निधी प्राप्त होता , पण याच्या दुरुस्ती देखभाल, ऑपरेटर पगार, डिझेल याच्या साठी वर्षाला सुमारे सात ते आठ लाख खर्च होणार असल्याने आणि त्यापेक्षा लाख दीड लाख रुपये भाड्या पोटी खर्च करणे परवडणारे असल्याचे आमच्या लोकप्रतिनिधींचे मत झाल्याने आम्ही जेसिबी खरेदी केला नव्हता. त्यामुळे नवीन खरेदी केलेल्या जेसिबी च्या खर्चाचे नियोजन कसे केले जाणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. कारण शहर सफाईसाठी मात्र स्वतः कचरा गाड्या खरेदी न करता भाड्याच्या गाड्या घेऊन काम केले जात आहे तर मग नवीन जेसिबी खरेदी करणे हा विरोधाभास नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. मालवण शहराच्या स्वछते साठी हा लाखो रुपयाचा जेसिबी घेतला आहे तर मग मागील दीड वर्ष सुमारे २५ लाख खर्च करून घेतलेल्या कचरापासून खत निर्मितीच्या मशीन बंद आहेत आणि याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या सुरु करण्या साठी जेसिबी खरेदी इतकी तत्परता का दाखवली गेली नाही याचेही कारण कळणे आवश्यक आहे असे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.

या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात अपंग निधी वितरणाचा 'इव्हेंट' वितरण झाला असे सांगत त्याबाबत महेश कांदळगांवकर यांनी खंत व्यक्त केली असून दरवर्षी अपंगांना न. प. निधीच्या ५% अपंग निधी दिला जातो आणि तो त्यांच्या हक्काचा निधी आहे. इतके वर्ष हा निधी त्यांच्या खात्यात परस्पर जमा केला जात आहे. पण कालच्या सभागृह नूतनीकरण कार्यक्रमात अपंगाना निमंत्रीत करण्यात आले. त्यांना चेक देतानाचे फोटो काढून प्रसिद्ध करण्यात आले. जे ज्यांच्या हक्काचे आहे ती मदत केल्याचे भासवून अपंगाच्या निधीचा असा इव्हेंट करण्यात आला हे अशोभनीय आहे असे म महेश कांदळगांवकर यांनी सांगितले आहे.

मागील दीड वर्ष या नगरपरिषद प्रशासकाच्या एकाधिकारशाही आणि मनमानी कारभारा विरुद्ध आवाज उठवूनही यावर कोणाचाही अंकुश नाही ही बाब सातत्याने जाणवत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्तिथी राहणार असेल भविष्यात याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेणे भाग पडणार आहे असा इशारा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!