मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे १६ व १७ डिसेंबरला ‘इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी आयोजित’ जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत खुल्या एकेरी गटात इशांत वेंगुर्लेकर, लहान गट एकेरीत योगेश परूळेकर, १५ वर्षांखालील एकेरीत प्रत्युष शेट्टिगार, खुला गट दुहेरीत तर साखळी सामन्यांमध्ये सुजन परब, राजाराम वालावलकर, आर्या दिघे यांचा गट विजयी ठरला. या स्पर्धा जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये संपन्न झाल्या.
स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे – लहान मुले व मुली विजेता – योगेश परूळेकर, उपविजेती- प्रतिभा परूळेकर, उपांत्य फेरी – वीरा वारंग, सई कांबळी. १५ वर्षांखालील मुले व मुली विजेता – प्रत्युष शेट्टिगार , उपविजेता- लौकिक तळवडेकर. उपांत्य फेरी- आर्या दिघे, आधिश पेडणेकर . महिला व पुरुष एकेरी – विजेता – इशांत वेंगुर्लेकर , उपविजेता- गौतम वाडकर, उपांत्य फेरी राजाराम वालावलकर, चंद्रकांत साळवे . दुहेरी विजेते- इशांत वेंगुर्लेकर चंद्रकांत साळवे, उपविजेते गौतम वाडकर, राजाराम वालावलकर. उपांत्य फेरी- पंकज तुळसुलकर, अतुल गवस, सुजन परब, गणेश भट . साखळी सामने विजेते – सुजन परब, राजाराम वालावलकर, प्रज्वल नामनाईक , उपविजेते- पंकज तुळसुलकर, गणेश भट,आर्या दिघे, .
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर,सचिव हेमंत वालकर व विश्वस्त शुभम मुळीक यांच्या हस्ते संपन्न झाला. पारितोषिक वितरण समारंभाला टेबल टेनीस खेळाडू व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हेमंत वालकर, लक्ष्मण मेस्त्री, सुजन परब, इशांत वेंगुर्लेकर, विलास परूळेकर, लौकिक तळवडेकर, दीक्षांत शिवापूरकर, आधिश पेडणेकर, प्रत्युष शेट्टिगार यांनी खूप मेहनत घेतली. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्राची चव्हाण, दीक्षांत शिवापूरकर , पावनी मालणकर, प्रत्युश शेट्टिगार, दुर्वा चिपकर, प्रज्वल नामनाईक आणि लौकिक तळवडेकर यांनी काम पाहिले. सामन्यांच्या संयोजनाची जबाबदारी हेमंत वालकर यांनी पार पाडली. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल स्पर्धेचे आयोजक या नात्याने विष्णू कोरगांवकर यांनी खेळाडू, पंच व इतर सर्वांचे आभार मानले.