बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ग्रामपंचायत व रुक्मिणी सुपर बाझार, बांदा
यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय बांदा.येथे सोमवार दिनांक १८ डिसेंबरला सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत, मोफत नेत्र शिबीर घेण्यात येणार आहे.
या शिबिरात संपूर्ण डोळे तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना डोळ्यांची समस्या असतील त्यांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. डोळे तपासणी करून झाल्यानंतर रुग्णाला गरज भासल्यास तीन हजार रुपये पर्यंतचा चष्मा फक्त रू.१६०- रुपयात लगेच देण्यात येईल. आजूबाजूच्या परिसरातील गावातील ग्रामस्थांनी, डोळ्याच्या समस्या असलेल्या रुग्णांनी या शिबिरामध्ये येत आपल्या डोळ्याची तपासणी करून घ्यावी. या शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बांदा ग्रामपंचायत बांदा व रुक्मिणी सुपर बाजार चे साईश तोरस्कर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी साईश तोरस्कर ९३२५२६९२३७ या मोबाईल नंबर वर संपर्क करायचा आहे.