वाढत्या इंधन व इतर महागाईमुळे तिकिट दरांमध्ये नाईलाजानेच ‘वीस टक्के ‘वाढ करावी लागणार असा खाजगी बस वाहन चालक -मालक व ऑपरेटर यांच्या बैठकीत एकत्रीत निर्णय .
कणकवली | उमेश परब : दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत आहेत. तसेच रस्ते खराब झाले आहेत. त्या तुलनेत प्रवाशांकडून मिळणारे तिकीट दर यामुळे वाहने रस्त्यावर चालवणे कठीण होऊन बसल्यामुळे खाजगी वाहन चालक मालक व ऑपरेटर यांच्या एकत्रित निर्णयाने सोमवार पासून मुंबई, पुणे, नाशिक ,कोल्हापूर येथे जाणाऱ्या खाजगी बस बंद ठेवून संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या संपावर तोडगा काढण्यासाठी कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथील हॉटेल सावली येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वीस टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला आहे. मात्र, भाडेवाढीचा निर्णय झाला आहे .मात्र हा निर्णय झाला असला तरी सोमवार आणि मंगळवार दोन दिवस गाड्या बंद राहणार असून २७ ऑक्टोबर पासून नवीन तिकीट दर लागू होऊन गाड्या सुरू होतील असे खाजगी बस चालक-मालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
ऐन दिवाळीच्या तोंडावर गोवा ,सिंधुदुर्ग वरून मुंबईला फिरायला जाण्यासाठी बरेच जण खाजगी बसने बाहेर पडतात. त्यावेळीच या खाजगी बस मालक, चालक व ऑपरेटर यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती.
मात्र, हुंबरठ येथे सोमवारी बैठक होऊन समग्र चर्चेअंती भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला बस चालक, मालक संघटना अध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष प्रसाद मांजरेकर ,गिरीश बाणे ,उदय देसाई ,विशाल मांजरेकर ,रुपेश कुर्ले, उमेश हळदणकर, राजू मुजावर , हर्षद प्रभु ,महेश धोंड, राजन कुमठेकर, संजय, विजय , आनंद लोहे, शिवा मांजरेकर, सिद्धेश परब , महेंद्र काळभोर ,मनोज चौगुले तसेच गोवा, मुंबई,पुणे येथील वाहन मालक, चालक , ऑपरेट उपस्थित होते.