बांदा | राकेश परब : शालेय शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून बांदा वाफोली मुख्यरस्ता ते आईरवाडी मंदिर या रस्त्याला राज्याच्या अर्थसंकल्पामधून आमदार दिपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार ३० लाख रु. निधी मंजूर झाला त्याचे भूमी पूजन वाफोली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रवी सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या वेळी सावंतवाडी शिवसेना उप तालुका प्रमुख भैय्या गोवेकर, विभाग प्रमुख राजेश विर्नोडकर, पांडुरंग नाटेकर, गिरीष नाटेकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सामाजिक कारकर्ते संजय आईर, माजी ग्रामपंचायत सदस्य डीगंबर आईर, अशोक आईर, विद्यमान ग्रा. प सदस्य स्नेहा आईर, संजय बांदेकर धर्मेंद्र खानोलकर , मंगेश आईर, लाडू आईर, पवन आईर, विठ्ठल कळगूटकर, तुषार आईर, मंगेश शिरोडकर, वर्षा आईर, सारिका आईर, अश्विनी आईर, चंद्रभागा आईर, मयंन आईर, दुर्वेश आईर ठेकेदार अमोल भाईप आईर वाडीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते