मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत गोळवण-कुमामे येथे ग्रामसभेचे औचित्य साधुन ‘आदर्श गांव’ योजने अंतर्गत प्रेरक प्रवेश अनुदानातून पूर्ण झालेल्या “ग्रा.पं. गोळवण-कुमामे-डिकवल येथे सभामंडप बांधणे” या विकास कामाचा उद्घाटन सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
यावेळी पं. स. मालवण चे मा. गटविकास अधिकारी उच्च स्तर वर्ग-१ श्री. आप्पासाहेब गुजर, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. पी. बी. ओहोळ, जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालय सिंधुदुर्गचे तंत्र अधिकारी श्री. आप्पासाहेब पाटील, पं. स. मालवण कृषि अधिकारी श्री. संजय गोसावी , विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) श्री. पी. डी. जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री. ए. एल. गुरव , कृषि पर्यवेक्षक श्री. डी. के. सावंत यांच्या उपस्थितीत सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सदरच्या ग्रामसभेत पं. स. मालवण चे माजी सभापती श्री. अजिंक्य पाताडे यांची राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत इ. ना. मानधन योजना जिल्हा स्तरीय समिती मध्ये सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. गोळवण – कुमामे – डिकवल सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रामसेविका सौ. अर्पिता शेलटकर, ग्रा.प. सदस्य श्री. साबाजी गावडे, श्री. विरेश पवार, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, सौ. शिल्पा तेली, श्रीम. एकादशी गावडे, पोलिस पाटील, शाळा मुख्याध्यापक, कृषि सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीम. करुणा राणे, श्री. रामकृष्ण नाईक, श्री. दत्ताराम परब तसेच ग्रामसभे साठी २२५ ग्रामस्थ उपस्थित होते.