25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सामाजिकतेच्या नांवाखाली काही आश्रम बनतायत आसारामचे आश्रम ; सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा खळबळजनक आरोप..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे समाजसेवक व उद्योजक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सामाजिक ‘आश्रम’ या प्रणालीबद्दल खळबळजनक आरोप केले आहेत. केवळ जिल्ह्यातील किंवा तालुक्यातल्याच नव्हे तर आजच्या घडीला संपूर्ण देशात वेगवेगळ्या संस्था ‘आश्रम’ स्थापन करून राजरोस शासनाची व जनतेची फसवणूक करत असल्याचा संताप त्यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केला आहे. पवित्र अशा ‘आश्रम’ प्रणालीला काही ठिकाणी ‘आसारामचे आश्रम’ बनवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

काही आश्रमांमध्ये, ‘सेवा म्हणजे नक्की काय करावे’ याचे नेमके भान कुणाला नाही असे खेदाने म्हणावे लागेल असे सांगत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हणले आहे की आज जवळ जवळ आठ ते दहा दिवस खुद्द कणकवली येथे एक नव्हे तर ३ ते ४ मनोरुग्ण राजरोसपणे संपूर्ण बाजार पेठेत धुमाकूळ घालत आहेत तरी कोणी लक्ष देत नसून एरवी केवळ फोटो व बातम्या यांपुरतेच आश्रम व त्यांना मिळणारी आर्थिक मदत मर्यादित आहे असा संशय येतो. विविध सामाजिक माध्यमांतून आश्रम वाल्यांना याबद्दल आवाहन केले होते परंतुआत्तापर्यंत कोणीही याकडे लक्ष देत सुद्धा नाही आहे. या दरम्यान जर काही बरेवाईट घडले तर याची कोण घेणार जबाबदारी कोणत्या सामाजिक किंवा प्रशासकीय यंत्रणेची असेल याचाही शासन व प्रशासनाने विचार करावा. शासकीय पैसा म्हणजे सर्व सामान्य नागरिकांच्या कष्टाचा आहे, सामाजिक व्यक्ती मदत करतात ती ही कष्टांच्या पैशातूनच असते त्यामुळे ‘आश्रम’ प्रणाली स्थापन करण्याआधी जशी छाननी केली जाते तसेच त्यांच्या कार्यपध्दतीवर शासनाचे कडक लक्ष असणे आवश्यक असल्याचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. ‘बघून बघून समाजसेवा’ करणार्या आश्रमांकडे व शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्थाकडे शासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी नमूद केले आहे. या मुद्द्याची शासन दरबारी नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे समाजसेवक व उद्योजक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सामाजिक 'आश्रम' या प्रणालीबद्दल खळबळजनक आरोप केले आहेत. केवळ जिल्ह्यातील किंवा तालुक्यातल्याच नव्हे तर आजच्या घडीला संपूर्ण देशात वेगवेगळ्या संस्था 'आश्रम' स्थापन करून राजरोस शासनाची व जनतेची फसवणूक करत असल्याचा संताप त्यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केला आहे. पवित्र अशा 'आश्रम' प्रणालीला काही ठिकाणी 'आसारामचे आश्रम' बनवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

काही आश्रमांमध्ये, 'सेवा म्हणजे नक्की काय करावे' याचे नेमके भान कुणाला नाही असे खेदाने म्हणावे लागेल असे सांगत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हणले आहे की आज जवळ जवळ आठ ते दहा दिवस खुद्द कणकवली येथे एक नव्हे तर ३ ते ४ मनोरुग्ण राजरोसपणे संपूर्ण बाजार पेठेत धुमाकूळ घालत आहेत तरी कोणी लक्ष देत नसून एरवी केवळ फोटो व बातम्या यांपुरतेच आश्रम व त्यांना मिळणारी आर्थिक मदत मर्यादित आहे असा संशय येतो. विविध सामाजिक माध्यमांतून आश्रम वाल्यांना याबद्दल आवाहन केले होते परंतुआत्तापर्यंत कोणीही याकडे लक्ष देत सुद्धा नाही आहे. या दरम्यान जर काही बरेवाईट घडले तर याची कोण घेणार जबाबदारी कोणत्या सामाजिक किंवा प्रशासकीय यंत्रणेची असेल याचाही शासन व प्रशासनाने विचार करावा. शासकीय पैसा म्हणजे सर्व सामान्य नागरिकांच्या कष्टाचा आहे, सामाजिक व्यक्ती मदत करतात ती ही कष्टांच्या पैशातूनच असते त्यामुळे 'आश्रम' प्रणाली स्थापन करण्याआधी जशी छाननी केली जाते तसेच त्यांच्या कार्यपध्दतीवर शासनाचे कडक लक्ष असणे आवश्यक असल्याचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. 'बघून बघून समाजसेवा' करणार्या आश्रमांकडे व शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्थाकडे शासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी नमूद केले आहे. या मुद्द्याची शासन दरबारी नोंद घेतली जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!