मुंबई | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी भातशेती बरोबर जोडधंदा म्हणून दूध विक्रीचा धंदा करत आहेत. त्यामुळे या धंद्यासाठी शेतकऱ्यांना कोल्हापूर वरून गुरांची ने- आण करावी लागते. अशावेळी गुरांची वाहतूक होत असताना पोलीसांकडून त्याची शहानिशा केल्याशिवाय शेतकऱ्यांवर कारवाई केली जाते.
शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तरी दुधाळ जनावरांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवू नये. शेतकऱ्यांना तशी मुभा देण्यात यावी आणि तशा सूचना पोलिसांना द्याव्यात व नाहक होणारा त्रास थांबवावा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.