कणकवली/ प्रतिनिधी : कणकवली, (सिंधुदुर्ग) दि. १२ डिसेंबर राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दिनांक ३०/१०/२०२३ रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कणकवली येथे अर्ज दिला होता. त्यामध्ये खालील प्रकारे उल्लेख केला आहे.
कणकवली येथील विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असुन, वेळीच संबंधितांनी उपयायोजना करावी. त्याकरिता मागील वर्षीसारखी परस्थिती येऊ नये, म्हणुन येत्या महिनाभरात गडनदीला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी प्लेट बसविणे अत्यंत महत्वाचे आहे.तसेच जानवली नदीच्या पात्रात माती, दगड रचुन पावसाळा संपल्यानंतर बंधारा केला जातो, तोही होणे अपेक्षित आहे. अन्यथा कणकवलीकरांवर पाण्यासाठी मागील वर्षासारखी वणवण फिरण्याची वेळ येऊ शकते, असे नमूद केले आहे.तरी उपरोक्त कळविलेप्रमाणे कणकवली येथील विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होऊ नये, याकरिता आपले स्तरावर योग्य त्या उपाययोजना करून उचित कार्यवाही करावी. तसेच अर्जदार यांना कळवुन प्रत या कार्यालयास सादर करावी.या अर्जात नमुद केल्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कणकवली यांनी योग्य ती दखल घेत, बंधाऱ्याला प्लेट बसुन तेथील पाणी योग्य रित्या अडविण्यात आले आहे.यावेळी राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ (कणकवली), माऊली मित्रमंडळ, राजेंद्र पेडणेकर शालेय मित्रमंडळ, ओम नमो भगवते भालचंद्राय या व्हॉट्सॲप ग्रुपचे सभासद आणि सदस्य, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि सदस्यांनी येथे प्रत्यक्षरित्या जाऊन पाहणी केली.त्यानंरच सर्वांनीच समाधान व्यक्त करत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कणकवली यांचा या अर्जाची दखल घेत, लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी केली. म्हणुन त्यांचा सी. आर. चव्हाण यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रभारी तहसीलदार सौ. दिप्ती देसाई यांनी प्रमुख उपस्थिती दाखविली.यावेळी सुभाष उबाळे, बाबु डगरे, भगवान कासले, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, सईद नाईक आदी उपस्थित होते.