विधानसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांचे राजकीय कार्यकर्त्यांना आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : दिनांक २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी तथा निकाल लागल्यानंतर शांततेत विजयोत्सवात साजरा करावा तसेच आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे असे आवाहन मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.
याबाबत पोलीस ठाण्याच्या वतीने राजकीय पदाधिकारी/ कार्यकर्ते यांना करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, उद्या शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी आपण शांततेच्या मार्गाने आनंदोत्सव साजरा करण्यात यावा. पराजीत झालेल्या उमेदवार यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे घरासमोर फटाके फोडणे, मोठ्या आवाजात स्पीकर लावणे, इत्यादी प्रकार करण्यात येऊ नयेत. सध्या आदर्श आचासंहिता तसेच जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरिता संचारबंदी व मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. निवडणूक अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून कार्यक्रम शांततेत पार पाडून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.