शौर्या सावंत हिला सिल्वर मेडल.
दोडामार्ग | प्रतिनिधी : सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या रंगोत्सव सेलेब्रेशन मुंबई संस्थेतर्फे विविध स्पर्धेत शाळा हेदूस – वाघमळा शाळेने घवघवीत यश प्राप्त केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली.

कु. शोर्या भूषण सावंत ( सिल्वर मेडल)
कु. मनस्वी शंकर नाईक, मिहीर अत्रेश धाऊसकर, सिताराम गणपत घाडी, अस्मी हर्षद धाऊसकर व सुरभी शंकर नाईक यांनी स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले. कु. शौर्या भूषण सावंत, कु. परी संतोष धाऊसकर, स्वरा संजीवन गवस, चैतन्य अमरनाथ कासार, भालचंद्र अतुल नाईक व सानवी सुहास गवस यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले. तसेच कु. रोहन प्रशांत करमळकर, चैतन्य सुभाष परब, सान्वी शरद गवस व श्रावणी सूर्यकांत बोर्डेकर यांनी ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी रंगोत्सव सेलेब्रेशन आर्ट मुंबई या संस्थेतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. रंगभरण स्पर्धा, कोलाज स्पर्धा, ठसा चित्र, हस्ताक्षर स्पर्धा, कार्टून स्पर्धा यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.