मालवण | प्रतिनिधी : इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी आयोजितजिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १६ आणि १७ डिसेंबरला जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथील श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाडूंना संधी मिळावी आणि टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी इंडियन ऑइलच्या सहकार्याने ही स्पर्धा मालवण मध्ये दरवर्षी आयोजित केली जाते आणि जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
या वर्षी प्रथमच टीम लीग पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.शिवाय महिला/पुरुष एकेरी आणि दुहेरी तसेच १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात खेळविली जाणार आहे. तसेच शिकाऊ मुला मुलींच्या गटात सुद्धा खेळविली जाणार आहे.
ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी श्री. विष्णू कोरगांवकर (मोबाईल ९४२१२३६४४६/८०८०२४८२०२) यांच्याकडे १४ डिसेंबर पूर्वी नांवे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.