23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

उदयापासून कोकण चित्रपट महोत्सव सुरू ; माजी आमदार व मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुरत्न कलावंत मंच, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, मालवण नगरपालिका यांच्या वतीने कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात, करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मालवणातील उदघाटन समारंभ देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर येथे १२ डिसेंबर रोजी दुपारी ११.३० वा. मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते होणार आहे.

या चित्रपट महोत्सवानिमित्त सकाळी १० वा. तारकर्ली बंदर जेटी ते देवबाग अशी चित्रपट दिंडी काढण्यात येणार आहे. तसेच १३ ते १५ डिसेंबर पर्यंत मालवण मधील भंडारी हायस्कुल, टोपीवाला हायस्कुल व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे महोत्सवासाठी पात्र ठरलेले मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत,कोकण चित्रपट महोत्सवाचा मुख्य शुभारंभ ११ रोजी रत्नागिरी येथे व समारोप १६ रोजी मालवण येथे होणार आहे. मालवण मधील महोत्सवाचा शुभारंभ देवबाग येथे मत्स्यगंधा थिएटर मध्ये १२ डिसेंबर रोजी होणार असून त्यास ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, वेतोबा मालिका फेम अभिनेते उमाकांत पाटील यासह मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी १० वाजता तारकर्ली बंदर जेटी ते देवबाग मत्स्यगंधा थिएटर अशी चित्रपट दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत स्थानिक लोककला व संस्कृती यांचे दर्शन घडणार आहे. ही दिंडी देवबाग ग्राम पर्यटन समिती अध्यक्ष व देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या सहकार्याने काढण्यात येणार आहे. यावेळी महोत्सवातील निवडक चित्रपट मत्स्यगंधा थिएटर मध्ये दाखविण्यात येणार आहेत.चित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांमध्ये मराठी चित्रपट सृष्टी बाबत प्रेम निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि चित्रपट क्षेत्रातील संधीबाबत मुलांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने १३ ते १५ रोजी मालवण मधील भंडारी हायस्कुल, टोपीवाला हायस्कुल व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी महोत्सवतील पात्र निवडक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तर १६ रोजी कोकण चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा मुख्य कार्यक्रम मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न होणार आहे. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. यावेळी अविनाश सामंत, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, सचिव दर्शन वेंगुर्लेकर, मनोज खोबरेकर, गजानन मांजरेकर, दादा सातोसकर आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!