बांदा /राकेश परब: बांदा शहरातील साईभक्त कै बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात विवीध धार्मिक व सामाजीक कार्यक्रम वर्षभर साजरे होते असतात. या दस-या दिवशी साईबाबा पुण्यतीथी उत्सव, रामनवमी उत्सव, सामुदाईक श्री साई सत चरीत्र वाचन, काकड आरती, भजन, दर गुरूवारी अभिषेक व साईची मध्यान आरती असे विवीध कार्यक्रम श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या आयोजनातून साजरे होतात. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाची स्थापना २०१८ साली झाली असून धार्मिक कार्यक्रमा सोबत सामाजीक कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले जातात. सिधूदूर्ग जिल्हात सामाजीक कार्यात हे मंडळ अग्रेसर आहे. या मंडळाच्या सल्लागार पदी भारतीय जनता पार्टिचे बांदा शहर अध्यक्ष व धडाडीचे कार्यकर्ते श्री नरसिहं श्यामकांत उर्फ बाबा काणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी अध्यक्ष राकेश केसरकर व सर्वानी त्याचे अभिनंदन केले. व बाबा काणेकर हे एक साईभक्त असून साईबाबा विषयी त्याना आस्था आहे. व ते धडाडीचे कार्यकर्ते व मनमिळावू असल्याने आमच्या मंडळाला चांगला उपयोग होईल.यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविद्र मालवणकर,सचीव दत्तप्रसाद केसरकर,खजीनदार राजेश कारेकर, शैलेश केसरकर,प्रितेश केसरकर, मनोज कल्याणकर,साईराज साळगावकर, मंगलदास साळगावकर, किशोर साळगावकर,प्रितम हरमलकर,सुशांत पांगम, प्रशांत पांगम, बंड्या हरमलकर, सतीष येडवे संदेश पावसकर, आषुतोष भांगले, दर्शना केसरकर, राजश्री तेंडले,संकल्प केसकर, राज हरमलकर उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -