27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ओसरगाव येथे १३ रोजी बालकुमार साहित्य कला संमेलन

- Advertisement -
- Advertisement -

राजे प्रतिष्ठान सिंधू आणि प्रा.शाळा ओसरगांव १ च्या संयुक्त विद्यमाने आयोजनस्वागताध्यक्ष किशोर कदम, विवेक परब यांची माहिती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला, सृजनशीलतेला आणि कलात्मकतेला प्रेरणा देणारे अभिनव असे एकदिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलन राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव प्रा.शाळा न.१ यांच्या संयुक्त विद्यमाने ओसरगाव शाळा नंबर एकच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे.बुधवार १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा.सुरू होणारे हे संमेलन नामवंत कवी अजय कांडारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असून यावेळी उद्घघाटक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशीलकुमार शिरवलकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात साहित्य आणि कला याविषयी मुलांना मार्गदर्शक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ओसरगाव प्राथमिक शाळा एकचे मुख्याध्यापक किशोर कदम आणि राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब यांनी दिली. संमेलनाची रूपरेषा जाहीर करताना श्री कदम श्री परब यांनी सांगितले की संमेलनाच्या उद्घघाटन सत्राला. सुप्रिया कदम सरपंच ओसरगाव, गटशिक्षाधिकारी कणकवली किशोर गवस, विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, वकील अँड.विलास परब, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिवबा अपराज आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान सकाळी नऊ वाजता ओसरगाव तलाव ते संमेलन स्थळ इथपर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून यात गावातील आबालवृद्ध स्त्री पुरुष सहभागी होणार आहेत.

संमेलनात उद्घाटन सत्रानंतर ‘कविता स्फुरते अशी’ हा कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध निवेदक राजेश कदम हे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या सत्रात “खजिना कथांचा..आविष्कार कथाभिनयाचा” हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यात मार्गदर्शन कथालेखिका आणि अभिनेत्री कल्पना बांदेकर करणार आहेत. दुपारी भोजनानंतर चौथे सत्र “किमया रंग-रेषांची. गट्टी चित्रकलेशी!” या विषयावर आयोजित करण्यात आले असून चित्रकार, इव्हेंट मॅनेजर प्रवीण चिंदरकर मार्गदर्शन करणार आहेत. पाचव्या सत्रात नृत्य दिग्दर्शक सुधीन तांबे हे नृत्य मार्गदर्शन करणार आहेत. तरी या साहित्य कला संमेलन सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही श्री कदम श्री परब यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

राजे प्रतिष्ठान सिंधू आणि प्रा.शाळा ओसरगांव १ च्या संयुक्त विद्यमाने आयोजनस्वागताध्यक्ष किशोर कदम, विवेक परब यांची माहिती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला, सृजनशीलतेला आणि कलात्मकतेला प्रेरणा देणारे अभिनव असे एकदिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलन राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव प्रा.शाळा न.१ यांच्या संयुक्त विद्यमाने ओसरगाव शाळा नंबर एकच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे.बुधवार १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा.सुरू होणारे हे संमेलन नामवंत कवी अजय कांडारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असून यावेळी उद्घघाटक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य सुशीलकुमार शिरवलकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात साहित्य आणि कला याविषयी मुलांना मार्गदर्शक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ओसरगाव प्राथमिक शाळा एकचे मुख्याध्यापक किशोर कदम आणि राजे प्रतिष्ठान सिंधूचे अध्यक्ष विवेक परब यांनी दिली. संमेलनाची रूपरेषा जाहीर करताना श्री कदम श्री परब यांनी सांगितले की संमेलनाच्या उद्घघाटन सत्राला. सुप्रिया कदम सरपंच ओसरगाव, गटशिक्षाधिकारी कणकवली किशोर गवस, विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, वकील अँड.विलास परब, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिवबा अपराज आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान सकाळी नऊ वाजता ओसरगाव तलाव ते संमेलन स्थळ इथपर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून यात गावातील आबालवृद्ध स्त्री पुरुष सहभागी होणार आहेत.

संमेलनात उद्घाटन सत्रानंतर 'कविता स्फुरते अशी' हा कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध निवेदक राजेश कदम हे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या सत्रात "खजिना कथांचा..आविष्कार कथाभिनयाचा" हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यात मार्गदर्शन कथालेखिका आणि अभिनेत्री कल्पना बांदेकर करणार आहेत. दुपारी भोजनानंतर चौथे सत्र "किमया रंग-रेषांची. गट्टी चित्रकलेशी!" या विषयावर आयोजित करण्यात आले असून चित्रकार, इव्हेंट मॅनेजर प्रवीण चिंदरकर मार्गदर्शन करणार आहेत. पाचव्या सत्रात नृत्य दिग्दर्शक सुधीन तांबे हे नृत्य मार्गदर्शन करणार आहेत. तरी या साहित्य कला संमेलन सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही श्री कदम श्री परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!