मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: पंचायत समिती गुहागर व लोकशिक्षण मंडळ आबलोली गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने 51 वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चंद्रकांत बाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे डॉ. जयंत नारळीकर विज्ञान नगरीमध्ये संपन्न झाले. या प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती या प्रकारामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा चिखली नं.1 येथील उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक श्री. सतीश पांडुरंग मुणगेकर याना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सतीश मुणगेकर यांचे मुळगाव देवगड तालुक्यातील मुणगे हे आहे. त्यांनी तयार केलेल्या ‘तंत्रज्ञानातून शिक्षण’ या त्यांच्या शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी निश्चित फायदा होईल. मोबाईल व संगणक यांच्या सहाय्याने अध्ययन अध्यापन प्रभावीपणे होण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. मुणगेकर यांनी आत्तापर्यंत स्वनिर्मित असे ऑफलाइन 25 शैक्षणिक ॲपची निर्मिती केलेली आहे.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात त्यांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन पाहायला आलेल्या मान्यवरांनी, विद्यार्थी शिक्षकांनी कौतुक केले. अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देताना त्यांच्या शैक्षणिक साहित्याच्या स्टॉलला भेट देऊन विविध शैक्षणिक ॲप्सचा अनुभव घेतला व वापर केला. विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस समारंभ प्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्री. केळस्कर, गटशिक्षणाधिकारी श्रीम.भागवत, लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत बाईत ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री गळवे, श्री संजय गोखले, विज्ञान मंडळाचे सदस्य श्री सुदेश कदम, श्री गणेश कुलकर्णी, श्री पराग कदम, आबलोली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गिरी तसेच सर्व केंद्रीय प्रमुख उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात सतीश मुणगेकर यांचे यश!
108
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -