वैशाली पंडित | मुख्य संपादक : ‘नवीन पाणी झुळझुळ वाणी हे आजपासून ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक सकारात्मक कृषी मानसीकता समजावणारे शालेय गीत होते.’ काळानुरुप ‘पाणी, शेती व माणुस ‘ अशी विचित्र गल्लत झाली आणि वैश्विक उष्णता सारख्या समस्यांना तोंड देताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ‘नवीन पाणी झुळझुळ वाणी’ गीताचे महत्व जितके अपेक्षित तितके क्रियेत घडू शकले नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांना उन्हाळी पाणी, शेती व पृथ्वीचे भविष्य याची जाणीव झाली. शेती ही शाब्दिक अलंकाराचे तत्व आहे परंतु शेती करणे , तिचा विचार करणे किंवा शेतकरी बनवण्यासाठी कुठलीच अलंकारीकता ही उपयोगी नसते तिथे कष्टाची ताकद, मातीचा प्रचंड अभ्यास व इच्छा शक्ती लागते.
,
पळसंब गावातील ‘शेतीची उन्नती’ डोळ्यासमोर ठेऊन स्थापन झालेले श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ,गावपातळीवर शेतीचा नवा उपक्रम राबवत असून त्याची सुरूवात वायंगण (गावठाण)येथून करण्यात येत आहे. याची तयारी म्हणून शेतीसाठी सर्वाच महत्वाचे असणारे पाणी नियोजन करण्यासाठी मंडळाचे सभासद उपस्थित होते.या सर्व सदस्यांनी श्रमदान करून धरण बांधण्याचे काम पूर्णत्वाला नेले.आता या पाण्याचा वापर उन्हाळी शेतीसाठी करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमी होत चाललेली उन्हाळी शेती पाहता पळसंब गावात हीच शेती नव्याने फुलवण्याचे ध्येय श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाने उराशी बाळगले आहे.या श्रमदान संघात मंडळाचे कृतीशील अध्यक्ष उल्हास सावंत ,अमरेश पुजारे, चंद्रकांत गोलतकर ,शेखर पुजारे , रमेश मुणगेकर , वैभव परब ,गुरु परब , ऋतिक पुजारे , संतोष परब, प्रमोद पुजारे, नितिन सावंत सहभागी झाले होते.
‘उद्या नदीला बांध घालुनी कोणी कालवा दिला काढुनी’ या त्याच कवितेतील ओळींकडे भविष्यातील प्रत्येक पळसंब् बालक बालिका बघतील व धन्यतेने श्री जयंतीदेवीसांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांतील प्रत्येक सदस्याचे आभार व्यक्त करतील…कारण ‘उलेलं बी व फुलेल पान..तुरा पिकांचा फुलवील उन्हाळ्यातही हिरवं रान….शेतीचे.!’