ब्युरो न्यूज/कणकवली : प्रो ऍक्टिव्ह अबॅकस कणकवली व नांदगाव येथील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या प्रो ऍक्टिव्ह नॅशनल अबॅकस स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रायगड या पाच जिल्ह्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये कणकवलीच्या 12 मुलांनी ट्रॉफी मिळवण्याचा विक्रम केला आहे व मुलांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे पार्थ तेली, चैतन्य ताईशेटे व रीशिता शर्मा ही मुले आपापल्या श्रेणीमध्ये अव्वल ठरली आहेत. तर वेदांत गुरव, मंथन वायंगणकर, फरहीन बटवाले, रुद्र सावंत, सनोबर पठाण, शौर्य नाचणे, वेदा महाडिक, कृष्ण बंडागळे व ऋता जोशी यांनी पहिल्या पाचात नंबर काढून ट्रॉफी मिळवली आहे. हे सर्वजण पुढच्या लेवलसाठी निवडले गेले आहेत. तसेच रुंजी खरात, शौर्य आणि श्रवण गावडे, अस्मि राऊळ, तनिष्का राणे, मानस पिळणकर, मोहित वायंगणकर, रुद्र मराठे, हर्षल परब, मीरा आपटे, सैफ बटवाले, शोएब बटवाले, पुष्कर महाडिक, पद्मज महाडिक, वैखरी सावंत, अवनी बावकर, रेया कोलते, काव्यश्री वाळके, मोक्षदा पारकर, समर्थ सावंत व तबरेज साटविलकर यांनी चांगली कामगिरी करत गोल्ड मेडल मिळवले आहे. सर्व मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सलग सातव्या वर्षी सेंटरला बेस्ट सेंटर म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. क्लासच्या संचालिका डॉ. स्नेहल जोशी यांचे मार्गदर्शन सर्व मुलांना लाभले. शाळा व पालक यांच्याकडून मुलांचे कौतुक होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -