संतोष साळसकर | सहसंपाद: कामगिरी काढलेल्या शिक्षकांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करा, अन्यथा शिरगाव बसस्थानक येथे २९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असे लेखी निवेदन चौकेवाडी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी देवगड पंचायत समितीचे गटविकास यांना दिले आहे.
देवगड तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा शिरगाव चौकेवाडी येथे पहिली ते सातवीचे वर्ग असून, यापूर्वी या शाळेत चार शिक्षक कार्यरत होते. मुख्याध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली तसेच कमी पटावरून जास्त पटाकडे या निकषानुसार या शाळेतील एका शिक्षकाची कामगिरी म्हणून दुसऱ्या शाळेत पाठविले. त्यामुळे चौकेवाडी शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग दोन शिक्षकांमध्ये सुरू राहिल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कामगिरी काढलेल्या शिक्षकांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करा, अशी येथील शाळा व्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यात उपोषण छेडण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी शिरगाव धोपटेवाडी येथील उपशिक्षिकेची पर्यायी व्यवस्था म्हणून शिरगाव चौकेवाडी शाळेवर नियुक्ती करण्याचे लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले होते.परंतु संबंधित उपशिक्षिका अद्यापपर्यंत चौकेवाडी शाळेत हजार झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबतचे लेखी निवेदन ७ नोव्हेंबर ला देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांनी दिले आहे. *नुकसानीस जबाबदार कोण*शिक्षक प्रश्नांवर चौकेवाडी ग्रामस्थांनी २८ व २९ ऑगस्टला शाळा बंद आंदोलन छेडले होते, यावेळी पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेल्या शिक्षकांमधून या शाळेला प्राधान्याने शिक्षक दिला जाईल तसेच या शाळेतील शिक्षकाची कामगिरी म्हणून केलेली नेमणूक रद्द करून पुन्हा याच शाळेत चार दिवसांत शिक्षक दिला जाईल, असे गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानंतर शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थांनी छेडलेले शाळा बंद आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले होते. त्यानंतर ३१ ऑगस्टला गटविकास अधिकारी यांनी पर्यायी शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या उपशिक्षिका तीन महिने होऊनही चौकेवाडी शाळेत हजर झालेल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत राणे यांचे म्हणणे आहे. परंतु, संबंधित उपशिक्षिका अद्यापपर्यंत चौकेवाडी शाळेत हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबतचे लेखी निवेदन ७ नोव्हेंबरला देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांनी दिले आहे.