जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सिंधुदुर्ग यांच्यातर्फे आयोजित केली गेलेली स्पर्धा.
चिंदर | विवेक परब :गुरू तेग बहादुरजी यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाच्या दृष्टीने ” जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुरुवार.दि.२३/०९/२०२१ रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रशालेतून या स्पर्धेसाठी सहा विध्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.या निबंध लेखन स्पर्धेतून मालवण तालुक्यातील, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी,मुंबई संचलित आर ए यादव हायस्कूल प्रशालेतील कुमारी ऋतुजा सुरेश मेस्त्री (इ.७वी) या विद्यार्थीनीची मालवण तालुक्यामध्ये तृतीय क्रमांकाने निवड झालेली आहे. तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
या यशाबद्दल तिच्या प्रशालेत अत्यंत उत्साहाचे वातावरण असून या यशाबद्दल तिचे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई अध्यक्ष,सदस्य,पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष,सदस्य,निमंत्रित सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तर्फे हार्दिक-हार्दिक अभिनंदन केले आहे.
प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी कु.ॠतुजा सुरेश मेस्त्री हिचे विशेष अभिनंदन करुन तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.