26.4 C
Mālvan
Monday, September 16, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

वेंगुर्ले येथील खरेदी – विक्री संघाच्या इमारतीला लागली आग ; खत दुकानाचे हजारोंचे नुकसान.

- Advertisement -
- Advertisement -

वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील खरेदी विक्री संघाच्या इमारतीला आग लागून खत दुकानाचे हजारोंचे नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सूत्रांकडून समजते. सजग नागरिकांनी वेळीच त्या ठिकाणी धाव घेत वेंगुर्ले पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे साडेचारच्या दरम्याने वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत विक्री इमारतीला अचानक आगीने पेट घेतला. त्या दरम्यान विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारी रहाणाऱ्या मोर्डेकर व समोर रहाणारे नाईक कुटुंबीयांना उठवले तसेच अग्नीशमन बंब व पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमीत नाईक, कुणाल नाईक. प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडुन पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश केला आणि पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यानंतर पहाटे साडेपाच पर्यंत आग पूर्णतः विझवण्यात यश आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील खरेदी विक्री संघाच्या इमारतीला आग लागून खत दुकानाचे हजारोंचे नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सूत्रांकडून समजते. सजग नागरिकांनी वेळीच त्या ठिकाणी धाव घेत वेंगुर्ले पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे साडेचारच्या दरम्याने वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत विक्री इमारतीला अचानक आगीने पेट घेतला. त्या दरम्यान विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारी रहाणाऱ्या मोर्डेकर व समोर रहाणारे नाईक कुटुंबीयांना उठवले तसेच अग्नीशमन बंब व पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमीत नाईक, कुणाल नाईक. प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडुन पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश केला आणि पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यानंतर पहाटे साडेपाच पर्यंत आग पूर्णतः विझवण्यात यश आले.

error: Content is protected !!