चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या तालुकावार सभा नियोजन
पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित नियोजित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळा रविवार दि.31 ऑक्टोबर 2021 रोजी हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा मंडळाने तालुकावार सभा नियोजनाचे आवाहन तालुका शाखांना केले होते.यानुसार तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले असून सदर सभांना जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.संत रविदास भवन निर्मितीचे चर्मकार समाजाचे स्वप्न असून सदर स्वप्नपूर्ती होत असल्याने समाजबांधवांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे.
तालुकावार सभांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.कुडाळ शाखा-शनिवार दि.23 रोजी सकाळी 10 वाजता,लिंगेश्वर प्रिंटर्स कुडाळ येथे मार्गदर्शक म्हणून ऍड.अनिल निरवडेकर(प्रमुख मार्गदर्शक),श्री.सुरेश पवार (जिल्हा उपाध्यक्ष),श्री.उदय शिरोडकर(भवन समिती कार्यवाह),सावंतवाडी शाखा-शनिवार दि.23 रोजी सायंकाळी 4 वाजता,सावंतवाडी डॉ.आंबेडकर समाजभवन येथे,मार्गदर्शक म्हणून ऍड.अनिल निरवडेकर(प्रमुख मार्गदर्शक ) श्री .लवू चव्हाण (जिल्हाउपाध्यक्ष),कणकवली शाखा रविवार दि.24 रोजी सकाळी 10 वाजता श्री.चंद्रकांत भोसले निवासस्थानी कणकवली येथे मार्गदर्शक श्री.सुजित जाधव(जिल्हाध्यक्ष),श्री.चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस),श्री.सुधीर जाधव(भवन समिती सहप्रमुख),देवगड शाखा रविवार दि.24 रोजी दुपारी 12 वाजता श्री.प्रशांत मिठबांवकर यांचे निवासस्थानी मिठबांव येथे मार्गदर्शक श्री.सुजित जाधव(जिल्हाध्यक्ष),श्री.चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस),श्री.नामदेव जाधव(जिल्हा कोषाध्यक्ष),मालवण शाखा रविवार दि.24 रोजी दुपारी 3 वाजता भवानी मंदिर नांदोस चव्हाणवाडी येथे मार्गदर्शक श्री.सुजित जाधव(जिल्हाध्यक्ष),श्री.चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस),श्री.श्रीराम चव्हाण(भवन समिती प्रमुख),वेंगुर्ला शाखा रविवार दि.24 रोजी सायंकाळी 4 वाजता साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे मार्गदर्शक म्हणून ऍड.अनिल निरवडेकर(प्रमुख मार्गदर्शक),श्री.उदय शिरोडकर (भवन समिती कार्यवाह) अशाप्रकारे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री.सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस श्री.चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.