मुंबई | ब्यूरो न्यूज : सध्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप २०२३ मध्ये धुमाकूळ घालत आहे. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ७ विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने किवी संघाचा ७० धावांनी पराभव केला. टीम इंडिया आता १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये केवळ १७ सामन्यात ५० विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कालच्या सामन्यानंतर शमीचं सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.
देशभरात एकीकडे मोहम्मद शमीवरती कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे, अशातच दुसरीकडे शमीबाबत दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करुन केलेल्या एका ट्वीटच्या चर्चा सोशल मिडीयावर जोरदार सुरू आहे.मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. काल सामन्यावेळी सर्वांना सामना हातातून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच शमीनं डावं पलटवला. शमीचं या खेळीचं सर्वत्र कौतुक केलं आहे, अशातच दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी मोहम्मद शामीच्या गोलंदाजीसंदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये मुंबई पोलिसांना टॅग करत दिल्ली पोलिसांनी लिहलं आहे की, ‘मोहम्मद शामीला अटक करू नका’. या पोस्टची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना टॅग करन एक पोस्ट लिहिली आहे. मोहम्मद शमीने सामन्यामध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीबाबत दिल्ली पोलिसांनी हे गंमतीशीर पोस्ट केली आहे. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना मोहम्मद शमीला अटक करू नका, असं म्हटले आहे.”मुंबई पोलीस, आम्ही आशा करतो, आज झालेल्या हल्ल्यासाठी तुम्ही मोहम्मद शमीला अटक करणार नाही.” याला उत्तर देत मुंबई पोलिसांनीही गंमतीशीर मार्मिक ट्वीट करत मिश्किलपणे म्हटले आहे की, “दिल्ली पोलीस, शामिने तुम्ही असंख्य लोकांची मनं चोरण्यासाठी कलम लावायला विसरलात आणि तुम्ही सह आरोपींची यादीही दिलेली नाही.”