मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली समुद्रात स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात गटांगळ्या खात बुडणार्या एका पर्यटकाला स्थानिकांनी वाचवत जीवदान दिले आहे. विनायक पुंडलिक लोहार असे त्या पर्यटकाचे नांव असून तो चंदगड येथील आहे. ही घटना आज बुधवारी सायंकाळी घडली असून विनायक लोहार याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला ओरोस येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला बुधवारी सायंकाळी त्याच किनाऱ्यावर चंदगड येथील १५ पर्यटकांचा एक समूह समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता. या पर्यटकांपैकी काही पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. मात्र त्यांनी एकमेकांचा आधार घेत किनारा गाठला. याच वेळी विनायक लोहार मात्र पाण्यात बुडू लागले. त्यांना मोठ्या शर्थीने पाण्या बाहेर काढण्यात यश आले. विनायक यांच्या पोटात पाणी गेल्या मुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांना तारकर्ली येथील दत्तराज चव्हाण यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन आणि छाती पोटावर दाब देत त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. त्यांचे सहकारी संकेत तारी वैभव सावंत, कौशल टिकम, नागेश देऊलकर यांच्या सहकार्याने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. शासकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते.
पर्यटकाला मिळाले जीवदान..!
133
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -