बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील आमची वाडी देऊळवाडी आयोजित नरकासुर स्पर्धेत खुला गट प्रथम क्रमांक ओम बॉईज उगवे, गोवा तर ग्रामीण गटामध्ये प्रथम क्रमांक एस. के. बॉईज बांदा यांना देण्यात आला. खुला गट द्वितीय क्रमांक माऊली शांतादुर्गा,वारखंड, गोवा, व भरत मित्र मंडळ केरवाडा शिरोडा यांना विभागून देण्यात आला. तसेच ग्रामीण गट द्वितीय क्रमांक राजन कासकर मित्र मंडळ, लकरकोट बांदा, तृतीय क्रमांक बांदेकर बॉईज बांदा यांना देण्यात आला.
आमची वाडी देऊळवाडी मित्र मंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, सुनील माजगावकर,
सुधीर साटेलकर, आबा सावंत, साई धारगळकर, माजी सरपंच बांदा दीपक सावंत
आबा माजगांवकर, गोकुळदास साळगावकर, मंदार माजगांवकर
नाना सावंत,गणेश म्हाडगूत
प्रथमेश साटेलकर, सिद्धेश कोरगावकर, गुरुनाथ साळगावकर, गौरव सावंत
आशिष सावंत आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्पर्धा रात्री उशिरापर्यंत रंगत आली होती. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे परीक्षण आर्टिस्ट रणजीत बांदेकर, स्वप्निल गडकरी, केदार कणबर्गी यांनी केले. स्पर्धेसाठी बहारदार सूत्रसंचालन नितीन नाईक, जय भोसले व राकेश परब यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमची वाडी देऊळवाडी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.